Old video is going viral on social media with a claim that crowd sang Vande Mataram in Gabba (Photo Credits: Twitter)

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओत भारतीय प्रेक्षक क्रिकेट मैदानात असताना हाताना तिरंगा घेऊन वंदे मातरम (Vande Mataram) गाताना दिसत आहेत. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अखेरचा सामना खेळण्यात आलेला गाबा मैदानावरील हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, एका न्युज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ गाबा मैदानातील नसून सोशल मीडियावर नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. तसेच हा दुबईच्या मैदानातील एक जुना व्हिडिओ असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.

ट्विटरच्या एका वापरकर्ताने AK याने 19 जानेवारी रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत मैदानातील प्रेक्षक वंदे मातरम गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहले होते की, ”Nothing can match this. The emotion, passion, resilience and the magic #AUSvsIND #Gabbabreached”. यानंतर हा व्हिडिओ प्रचंड वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे देखील वाचा- IND vs ENG Series 2021: टीम इंडियाची ऑस्ट्रेलियातील कामगिरी पाहून इंग्लंड हादरला, माजी स्पीनर Graeme Swann यांनी दिला महत्त्वाचा सल्ला

ट्विट-

व्हिडिओ-

सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्‍या सामन्यादरम्यानचा आहे. परंतु फॅक्ट चेकमध्ये हे उघड झाले की, हा व्हिडिओ 24 सप्टेंबर 2018 रोजी यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे.