महिन्याभरापूर्वी म्हणजेच 5 ऑक्टोबरला क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह याने ट्विटद्वारा अभिनंदन करत ही गोड बातमी शेअर केली होती. त्यानंतर बरोबर 1 महिन्याने अजिंक्य रहाणेने आपल्या गोंडस चिमुकलीचा फोटो शेअर केला आहे. इतकंच नव्हे तर या फोटोसह त्याने आपल्या मुलीचे नावही आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. या चिमुकलीच्या येण्याने अजिंक्य रहाणे यांचे संपूर्ण कुटूंब आनंदात असून त्याच्या नातेवाईकांसह त्याचे चाहते नुकतेच आई-बाबा झालेल्या अजिंक्य आणि त्याची पत्नी राधिकावर (Radhika Rahane) शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
अजिंक्य ने आपल्या मुलीचा गुलाबी रंगातील ड्रेसमधील एक गोड फोटो आपल्या इन्स्टा अकाउंटवरुन शेअर केला आहे. यात या चिमुरडीचे लुकलुकते डोळे सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
हेदेखील वाचा- अजिंक्य रहाणे याच्या घरी येणार नवीन पाहुणा, पत्नी राधिकाच्या डोहाळेजेवणाचे Photo शेअर करत सांगितली गुड न्यूज
अजिंक्य ने आपल्या मुलीचे नाव आर्या ठेवले असून या फोटो खाली आर्या अजिंक्य रहाणे असे लिहिले आहे. काही महिन्यांपूर्वी अजिंक्यने सोशल मीडियावरूनच राधिकाच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत लवकरच 'बाबा' होणार असल्याची गूड न्यूज चाहत्यांना दिली होती.
राधिका आणि अजिंक्य रहाणे यांचा प्रेमविवाह आहे. 26 नोव्हेंबर 2014 साली ते लग्नबेडीत अडकले. लहानपणापासूनच मित्र असलेले राधिका आणि अजिंक्य यांच्या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.