AB de Villiers Retirement: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या (AB de Villiers) आंतरराष्ट्रीय कमबॅकवर मागील वर्षांपासून अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. डिव्हिलियर्स यंदा भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आफ्रिकी संघाचे प्रतिनिधित्व करेल अशी चर्चा मागील वर्षांपासून सुरु होती. तथापि आता दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे प्रमुख व संघाचे माजी कर्णधार ग्रीम स्मिथने (Greame Smith) आयपीएल (IPL) सोबत जगभरातील अन्य टी-20 स्पर्धा गाजवणारा डिव्हिलियर्सच्या निवृत्तीचा निर्णय कायम राहील अशी बिग ब्रेकिंग देत संपूर्ण चर्चेवर पूर्णविराम लावला. आगामी वेस्ट इंडीज दौर्यासाठी सीएसएने (CSK) संघ जाहीर केल्यानंतर ही मोठी घटना समोर अली. सीएसएने आता म्हटले आहे की डिव्हिलियर्सने “एकदाच” ठरवले आहे की त्यांची निवृत्ती फायनल राहील. (हे 5 महान कर्णधार आपल्या कारकिर्दीत नाही उंचावू शकले ICC ट्रॉफी, यादीत एक भारतीय दिग्गजाचाही समावेश)
“एबी डिव्हिलियर्सशी झालेल्या चर्चेचा फलंदाजाने एकदा निर्णय घेतलेला आहे की, त्याची निवृत्ती अंतिम राहिल,” क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने एका निवेदनात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असतानाही डिव्हिलियर्स फ्रँचायझी क्रिकेट खेळत असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघासाठी सतत कामगिरी करत आहे. कोविडच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या यावर्षीच्या आयपीएलमध्ये 37 वर्षीय दिग्गज फलंदाजाच्या आश्चर्यकारक कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय पुनरागमन झाल्याची चर्चा आणखी वाढली. सीएसएने आयर्लंड आणि वेस्ट इंडीज मालिकेसाठी आणखी पथके जाहीर केली. 2020 मधील स्थगित केलेल्या दौऱ्यावर 10 जून ते 3 जुलै 2021 या कालावधीत राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील डॅरेन सॅमी क्रिकेट मैदानावर आणि ग्रॅनडा येथे अनुक्रमे 10 जून ते 3 जुलै 2021 या कालावधीत दोन कसोटी सामने आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाईल.
🇿🇦 Cricket South Africa have confirmed that star batsman @ABdeVilliers17 will not come out of his retirement.
Hence, he will not participate in this year's @T20WorldCup. pic.twitter.com/fHxmYjQsDE
— ICC (@ICC) May 18, 2021
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध केवळ 34 चेंडूत नाबाद 76 धावा फटकावल्यानंतर डीव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांच्याशी संभाव्य पुनरागमनविषयी बोलण्याविषयी सांगितले होते. आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात मार्क बाऊचरशी चर्चेत भाग घेतांना दक्षिण आफ्रिकेकडून पुन्हा खेळणे आश्चर्यकारक ठरेल असे आयपीएल 2021 दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कडून खेळणाऱ्या डिव्हिलियर्सने म्हटले होते.