बेन डंकने पावसामुळे मैदानात जमलेल्या पाण्यात लगावली धाव (Photo Credit: Twitter/CPL)

कॅरिबियन प्रीमियर लीगचा (Caribbean Premier League) 2020 हंगाम त्रिनिदादमध्ये सुरु झाला आहे, परंतु इथल्या पावसाने खेळाडू आणि संयोजकांना त्रस्त करून सोडले आहे. पावसामुळे आतापर्यंत चार सामन्यांवर परिणाम झाला आहे. पावसामुळे काही सामन्यांवर प्रभाव पडला असला तरी ते वेळेवर पूर्ण झाले आहेत, तर पावसामुळे गुरुवारी होणारा सामना रद्द करावा लागला. सीपीएल (CPL) 2020 चा 25 वा सामना जमैका थलावाज (Jamaica Tallawahs) आणि सेंट किट्स आणि नेव्हिस पैट्रियट्स (St Kitts and Nevis Patriots) यांच्यात खेळला जाणार होता. सामना वेळेवर सुरू झाला, परंतु त्यानंतर असा पाऊस पडला की मैदानाचे तलावात रूपांतर झाले. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा खेळाडू बेन डंक भर पावसांत मैदानावर भरलेल्या पाण्यात धावताना दिसला. (CPL 2020: निकोलस पूरनने झळकावले सीपीएलचे तिसरे सर्वात जलद शतक, षटकारांची हॅटट्रिक करत ठोकली पहिली टी-20 चेंचूरी Watch Video)

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत सेंट किटने एकही विकेट न गमावता 5.4 ओव्हरमध्ये 46 धावा केल्या. यानंतर पावसामुळे सामना पुन्हा सुरु होऊ शकला नाही. या दरम्यान, मैदानावर भरलेल्या पाण्यात डंक मैदानाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत धावताना दिसला. यानंतर डंकसाठी त्याच्या टीम मेट्सने टाळ्यांचा कडकडाटात त्याच कौतुक केलं. पाहा व्हिडिओ

दरम्यान, डंकचा हा व्हिडिओ मजेशीर असला तरी सोशल मीडियावर यूजर्सचा मात्र गोंधळ उडाला. बायो बबल आणि कोविड प्रोटोकॉलचा भाग आहे का, ते डंक नशेत आहे अशा प्रतिक्रिया यूजर्सकडून पाहायला मिळाल्या.

शूर डंक ....

डंक नशेत

बायो बबल आणि कोविड प्रोटोकॉल

डंक भावा चांगला धावलास

पीएसएल 5 प्लेऑफबद्दल ऐकल्यानंतर बेन डंक

बेन डंक आणि त्यांच्या साथीदारांमध्ये एक पैज लागली होती की ते न थांबता मैदान पार करून आणि मग परत येऊ शकतात की नाही. सामन्याच्या बाबतीत खेळाडू बर्‍याचदा असे करतात. तथापि, या मागील सकारात्मक चित्रही पाहायला मिळाले की 33 वर्षीय बेन शारीरिकरीत्या भारी असूनही तो तंदुरुस्त आहे.