CPL 2019: शाहरुख खान याने ड्वेन ब्राव्हो याच्यासह केला 'लुंगी डान्स', Video सोशल मीडियात व्हायरल
(Photo Credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) सलग तिसर्‍या विजय आपली टीम ट्रिनबागो नाइट रायडर्स (Trinbago Knight Riders) संघात जल्लोषात साजरा केला. मैदानावर चीअरलीडर्सबरोबर नाचल्यानंतर आता 'किंग खान' चा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संघाच्या तिसरा विजय साजरा करण्यासाठी शाहरुख आणि त्याची टीम विंडीजमधील एका क्रूझ वर पोहचली होती. या क्रूझवरील पार्टी दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख विंडीज क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) याच्यासोबत 'लुंगी डान्स' करताना दिसत आहे. शाहरुखबरोबर क्रिकेटपटूंची ही मस्ती चाहत्यांना पसंत पडली आहे. (West Indies विरुद्ध शतकी खेळीनंतर विराट कोहली याने दिली Chahal TV ला खास मुलाखत, आपल्या डान्सबद्दल केले हे रोचक विधान, पहा Video)

शाहरुख खान सोशल मीडियावर आपल्या टीमबरोबर कॅरिबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) मध्ये मस्ती करत आहे. अलीकडेच त्याच्या डान्सचे अनेक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये शाहरुख ड्वेनसमवेत त्याचे सुपरहिट गाणे 'लुंगी डान्स' वर नाचताना दिसत आहे. ब्राव्हो आणि शाहरुखबरोबर संघातील अन्य खेळाडूही मजा करीत आहेत. शाहरुख आणि त्याच्या टीमच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. पहा व्हिडिओ:

ट्रिनबागो नाइट रायडर्स संघात वेस्ट इंडिजचे बहुसंख्य खेळाडू आहेत. शाहरुखला अभिनयासोबत खेळातही खूप रस आहे. या टीमशिवाय शाहरुख आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्सचा मालकही आहे. क्रीडा उत्साही शाहरुख आपल्या संघाची जाहिरात करण्यासाठी वेस्ट इंडिजमध्ये स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच आहे. या व्हिडिओसह शाहरुखचा मागील व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. यात तो चीरलीडर्स सोबत डान्स करताना दिसत होता.