West Indies विरुद्ध शतकी खेळीनंतर विराट कोहली याने दिली Chahal TV ला खास मुलाखत, आपल्या डान्सबद्दल केले हे रोचक विधान, पहा Video
विराट कोहली आणि युझवेन्द्र चहल (Photo Credit: @BCCI/Twitter)

भारतीय संघ (Indian Team) सध्या वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर आहे. आणि आपल्या खेळीने चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. भारत आणि विंडीजदुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत सामना जिंकला. या मॅचमध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने वनडेमधील 42 वे शतक ठोकले. आणि भारताच्या सामना जिंकण्यात महत्वाचे योगदान दिले. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघातील पहिली वनडे पावसामुळे रद्द केली होती. या मॅचनंतर कोहलीने चहल टिव्हीला (Chahal TV) एक खास मुलाखत दिली. चहलबरोबर झालेल्या मुलाखतीदरम्यान कोहली म्हणाला की मी मैदानावर खेळाचा खूप आनंद घेत आहे. (IND vs WI 1st ODI 2019: मैदानावर मस्तीच्या मूडमध्ये दिसला विराट कोहली, कॅरेबियन गाण्यावर असा केला डान्स, पहा Video)

दरम्यान, पहिल्या वनडे सामन्यात पावसाने विघ्न घालण्याआधी विराट मैदानातील कर्मचाऱ्यांसोबत डान्स करताना दिसून आला होता. शिवाय, त्याने क्रिस गेल (Chris Gayle) आणि केदार जाधव (Kedar Jadhav) यांच्या सोबत देखील डान्स करण्याचा आनंद लुटला. याचा व्हिडीओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबद्दल चहलने विचारले असता सांगितले की, "सामन्या दरम्यान पाऊस पडल्यानंतर गर्मी अधिक वाढल्याने 60- 65 धावा केल्यानंतर मी थकलो होतो. देशासाठी खेळण्याची संधी मिळाल्याने प्रत्येक क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करतो आहे. शिवाय, मी जेव्हा कोणतेही संगीत ऐकतो तेव्हा मला नृत्य करावसं वाटतं."

भारताचा पुढील सामना विंडीजशी तिसऱ्या आणि अंतिम वनडेमध्ये बुधवारी, 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. हा सामना देखील त्याच मैदानावर होणार आहे जिथे दुसरा वनडे सामना खेळला गेला होता. भारताने वनडे सामने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे तिसरा वनडे सामना जिंकत भारत टी-20 प्रमाणेच वनडे सामन्यात देखील विंडीजचा व्हाईट वॉश करण्याच्या निर्धारित असेल.