Coronavirus: वर्कआउट्स, पत्नी रितिकासमवेत स्वयंपाक; लॉकडाउनमध्ये कसा आहे 'हिटमॅन' रोहित शर्माचा शेड्यूल, पाहा व्हिडिओ
रोहित शर्माचा लॉकडाउन शेड्यूल (Photo Credit: Instagram/VideoScreenGrab)

टीम इंडियाचा सलामी फलंदाज आणि आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नुकतंच सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात त्याने लॉकडाउन दरम्यानच्या शेड्यूल बद्दल सांगितले आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी 3 मेपर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाउनने स्टार क्रिकेटपटूंना त्यांच्या व्यस्त क्रिकेट वेळापत्रकातून आराम दिला आहे. जगभर झालेल्या कोरोना व्हायरसच्या प्रसाराने लोकांची लाइवस्टाईल बदलून टाकली आहे. घरातील कामकाजापासून ते लाईव्ह चॅट पर्यंत क्रिकेटपटू लॉकडाउन दरम्यान घरात राहून स्वत:ला व्यस्त ठेवत आहेत. कोरोना विषाणूमुळे क्रिकेट पूर्णपणे बंद झाले आहे आणि खेळाडूंना त्यांच्या घरीच राहावे लागत आहे. रोहितने 'माय डे इन लॉकडाउन' कॅप्शनच्या व्हिडिओमध्ये रोहित काही घरातील प्रशिक्षण घेण्यापूर्वी हेल्थ ड्रिंक घेऊन दिवसाची सुरुवात करताना दिसू शकतो. (जोस बटलरने रोहित शर्माच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप, इंग्लंड फलंदाजाने केले बॅटिंगचे कौतुक, पाहा काय म्हणाला)

वर्कआउट सत्रानंतर रोहितला त्याच्या बाल्कनीतून गरम पेय एन्जॉय करतोय. त्यानंतर पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरारॉबत रोहित बोर्ड गेम खेळतो. त्यानंतर तो पुन्हा एकदा वर्कआउट करतो ज्यात ज्यात समायरा सामील होते. त्यानंतर रोहित स्वयंपाकात पत्नीला मदत करण्यापूर्वी कपडे धुण्यासह काही घरगुती कामं करतो. व्हिडिओच्या अखेरीस रोहित आणि रितिकात्यांच्या लिव्हिंग रूममध्ये लोकप्रिय कार्यक्रम 'फ्रेंड्स' पहात असताना दिसतात. पाहा हा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

😉

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने महिला सलामी फलंदाज स्मृती मंधानाचा लॉकडाउनमधील व्हिडिओ शेअर केला होता ज्यात ती सध्या घरी राहून काय करत आहे, सह खेळाडूंशी कशा प्रकारे संवाद साधत आहे अशा अनेक गोष्टींचा खुलासा केला. लॉकडाउन दरम्यान ती घरी आईला मदत करत असल्याचे स्मृतीने उघड केले आहे. मंधाना म्हणाली, 'मला कुटुंबासमवेत वेळ घालवायला आवडत आहे. आम्ही एकत्र पत्ते खेळतो. मी माझ्या आईला स्वयंपाक करण्यास मदत करत आहे. भांडी साफ करणे हे माझ्या नित्याचा भाग बनले आहे आणि त्याशिवाय मला माझ्या भावाला त्रास देणे देखील आवडते. यासह वेळ घालवणे हे माझे आवडते काम आहे.'