टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांनी वडोदरा पोलिसांना (Vadodara Police) कोविड-19 (COVID-19) विरोधात रोग प्रतिकारशक्तीच्या वाढवण्याच्या विटामिन-सीच्या गोळ्या उपलब्ध करुन दिल्या. कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभर थैमान घातले आहे. तब्बल 34 लाख लोकांनी या व्हायरसमुळे आपला जीव गमावला आहे. भारतात देखील संक्रमितांचा आकडा 40 हजाराच्या पुढे गेला आहे. देशांत 24 मार्च पासून करण्यात आलेले लॉकडाउन 17 मे पर्यंत अजून पुढे ढकलण्यात आले आहे. या काळात डॉक्टर, परिचारिका, पोलिस इतर देशाच्या स्थिती सुधारणेसाठी अथक परिश्रम घेत आहेत. देशभर लोक सरकारने दिलेले नियम मोडत नाहीत आणि अनावश्यक मेळावे देखील होत नाहीत याची दक्षता पोलिस घेत आहे. वडोदरा शहर पोलिसही आपले काम योग्य रीतीने करीत आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी राज्यातील दोन सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुढे सरसावले आहेत. (Coronavirus: कोरोनाग्रस्तरांच्या मदतीसाठी विराट कोहली याने पुन्हा घेतला पुढाकार, एबी डिव्हिलियर्स याच्या साथीने अशा प्रकारे करणार आर्थिक मदत)
पठाण बंधूंनी वडोदरा पोलिसांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि कोरोना व्हायरस विरूद्ध लढ्यात दृढ राहण्यासाठी विटामिन-सीच्या गोळ्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. ट्विटरवर वडोदरा शहर पोलिसांनी दोन्ही क्रिकेटपटूंच्या त्यांच्या जेस्चरबद्दल आभार मानले. "भारतीय पोलिस वडोदरा शहर आयुक्त श्री अनुपम सिंह गहलौत सर यांना पोलिस वापरासाठी व्हिटॅमिन सी गोळ्या प्रदान केल्याबद्दलइरफान पठाण, युसुफ पठाण यांचे धन्यवाद."
नेटकरीही पठाण बंधूंचे या दयाळू कामगिरीबद्दल कौतुक करत आहे. पाहा यूजर्सच्या प्रतिक्रिया:
सेवेवर विश्वास ठेवणारे...
One of the most genuine cricketers who believe in service... Pathan bros take a bow...
— Kapil Iyer (@kpill420) May 2, 2020
धन्यवाद
It's always good to see people like you are there help .. thank you sir
— Ankit (@AnkitDey_CGR) May 2, 2020
अभिमान आहे
Thanks a lot Yusuf sir I proud of you sir I am big your fan
— Manoj Kumar Makwana (@ManojKumarMakw6) May 2, 2020
कोरबो लोरबो जीतबो रे
Korbo lorbo jeetbo re ami kkr
— Tauqueer Sidd (@tauqueer_sidd) May 2, 2020
युसूफ भाई, असेच चालू ठेवा
माशाअल्लाह बहुत अच्छा काम कर, रहे, हो, युसुफ भाई ऐसे ही लगे रहो।
— Mohammad Aarif (@Mohamma42800430) May 2, 2020
पठाण बांधवांनी या कठीण काळात मदतीचा हात देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी त्यांच्या भागातील गरीब लोकांना फेस मास्क दान केले आणि त्यानंतर गरजू लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी सुमारे 10000 किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटा देखील वाटून घेतला.