Srilanka Cricket Team (Photo Credits: PTI)

बुंडेस्लिगा टूर्नामेंटसह युरोपमध्ये फुटबॉल तब्बल दोन महिन्यानंतर पुनरागमन केले आणि जर सर्व काही नियोजनाप्रमाणे गेले तर क्रिकेटही आगामी जुलै महिन्यात चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी परत येऊ शकते. सर्व ठरलेल्या योजनानुसार झाले तर भारताविरुद्ध (India) श्रीलंका (Sri Lanak) आगामी जुलै महिन्यात मालिकेचे आयोजन करेल. मर्यादित षटकांच्या मालिकेत त्यांनी भारतीय समकक्षांशी चौकशी केली असल्याचे श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने पुष्टी केली. श्रीलंका क्रिकेटने (SLC) येत्या दोन महिन्यांत भारत आणि बांग्लादेशविरुद्ध (Bangladesh) मालिकेच्या योजना आखल्या आहेत. “आम्ही भारत आणि बांग्लादेश, या दोन्ही मंडळांकडून चौकशी केली असून त्यांच्याकडून प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत. आतापर्यंत त्या मालिका पुढे ढकलण्यात आल्या नाहीत," एसएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एशले डी सिल्वा यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले. (VPL: कोरोना काळात बदलेल्या नियमांसह 22 मे पासून होणार टी-10 लीगची सुरुवात; बॉलवर लाळ लावण्यावर बंदी घालणारी बनली पहिली टूर्नामेंट)

श्रीलंका भारतविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी-20 मालिका आणि त्यानंतर बांग्लादेशविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग म्हणून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करणे अपेक्षित आहे. कोरोना व्हायरसने जगभर पाय पसरवले असल्याने सध्या या दोन्ही मालिका सध्या अडचणीत आल्या आहेत. सर्वप्रथम, भारत आणि बांग्लादेश क्रिकेटपटूंना श्रीलंकेचा दौरा करण्यासाठी संबंधित तिन्हींनी देशांनी लादलेली प्रवासी निर्बंध हटविली पाहिजेत. भारतात 31 मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आल्याने भारतातील उड्डाणांचे कामकाजही निलंबित राहिले आहे. श्रीलंका आणि बांग्लादेशनेही कठोर लॉकडाउन नियम लागू केले आहेत.

कोरोनामुळे श्रीलंकेने त्यांचे दोन घरगुती दौरे यापूर्वीच रद्द केले आहेत. ज्यामध्ये आता इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची होम सिरीज आता पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस खेळवता येईल. इतकेच नाही तर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध श्रीलंकेची मालिकाही कोरोनामुळे रद्द करावी लागली.