पाकिस्तानी क्रिकेटर अजहर अली (Photo Credit: Getty)

कोविड-19 च्या (COVID-19) काळात गरजूंना मदत करण्यासाठी लिलावात पाकिस्तानचा (Pakistan) कसोटी क्रिकेट कर्णधार अजहर अली (Azhar Ali) याची एक बॅट पुणे येथील क्रिकेट संग्रहालयाने विकत घेतली आहे. या प्राणघातक आजाराने पीडित लोकांसाठी निधी जमा करण्याच्या पार्श्वभूमीवर अजहरने आपल्या दोन संस्मरणीय वस्तू लिलावात ठेवल्या होत्या. यात वेस्ट इंडिजविरुद्ध 2016 च्या कसोटी सामन्यात त्याने ज्या फलंदाजीने 302 धावा फटकावल्या याचाही समावेश आहे. डे-नाईट कसोटी (Day/Night Test) सामन्यात तिहेरी शतक करणारा अजहर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहे. याखेरीज त्याने 2017 भारताविरुद्ध (India) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्येही परिधान केलेली जर्सी लिलावासाठी ठेवली होती. बॅट आणि जर्सी या दोन्ही वस्तूंवर पाकिस्तान संघाच्या सदस्यांनी सही केली होती. अजहरने सोशल मीडियावर बॅट आणि जर्सीसाठी प्रत्येकी 1 मिलियनची किंमत ठेवली आहे आणि त्याने ते 2.2 मिलियनमध्ये विकली आहेत. पुण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियमने  1 लाख रुपयांची विजयी बोली लावून बॅट खरेदी केल्याची पाकिस्तानी फलंदाजाने पुष्टी केली. (Coronavirus: यूसुफ पठान, इरफान पठान यांनी वडोदरा पोलिसांना विटामिन-सीच्या गोळ्या केल्या दान, 'खरा' क्रिकेटपटू म्हणून Netizens कडून कौतुक)

अजहर म्हणाला की, शर्टच्या लिलावानेही बरीच आवड निर्माण केली आणि कॅलिफोर्नियामध्ये राहणारे पाकिस्तानी काश विलानी यांनी सर्वाधिक 1.1 मिलियन रुपयांची बोली लावली. न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या आणखी एक पाकिस्तानी जमाल खाननेही त्यांना 100,000 कामासाठी देणगी दिली. लिलाव सुरू झाल्यानंतर अजहरने ट्वीट केले की, “सध्याच्या संकटाचा सामना करत असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी मी माझ्या दोन विशेष वस्तू लिलावासाठी ठेवल्या आहेत आणि त्यांची आधारभूत किंमत 1 मिलियन पाकिस्तानी रुपये आहेत. लिलाव सुरू झाला आहे आणि 5 मे 2020 रोजी रात्री 11.59 वाजता संपेल.”

2016 मध्ये अजहरनेवेस्ट इंडिजविरुद्ध युएईमध्ये नाबाद 302 धावा केल्या. ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत अली म्हणाला, “हा शर्ट 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीचा आहे जो आम्ही जिंकला, त्यात संघात उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंची स्वाक्षरी आहे. या दोन्ही गोष्टी माझ्या हृदयाच्या जवळ आहेत पण जर लोकांच्या हितासाठी कठीण काळात याचा उपयोग केला गेला तर मला आनंद होईल.”