ऑस्ट्रेलियाचा (Australia) मर्यादित षटकांचा कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) म्हणाला की कोरोना व्हायरसमुळे टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) तीन महिन्यांकरिता पुढे ढकलला जणू शकतो. टी -20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. सध्याच्या आरोग्याच्या संकटामुळे जगभरातील लाखो लोकांना याचा त्रास होत आहे. फिंचने 'सेन रेडिओ'ला सांगितले की, "मला वाटते की टी-20 वर्ल्डकप आम्हाला एक महिना, दोन महिने, तीन महिने पुढे ढकलले जावे लागेल." फिंचचे म्हणणे आहे की सध्याचे जगातील सर्वत्र असलेले संकट पाहता टूर्नामेंट वेळेवर असण्याची शक्यता दिसत नाही. तो म्हणाला की, साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवल्यानंतर सामना प्रेक्षकांविनाच करण्यासही त्याचा विरोध नाही. तो म्हणाला, 'लाईव्ह सामने असावेत. प्रेक्षक असले की नाहीत, मला नाही वाटत की यामुळे खेळाडूंमध्ये काही फरक पडतो." टी-20 वर्ल्ड नियोजित वेळी व्हावा यासाठी काहींनी रिक्त स्टेडियममध्ये खेळण्याचा सल्ला दिला तर काहींनी याचा विरोध केला. (भारतात होऊ शकते IPL, टी-20 वर्ल्ड कप 2020 चे आयोजन, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दिला प्रस्ताव)
फिंच म्हणाला, “आम्ही न्यूझीलंडविरुद्ध प्रेक्षकविना सामना खेळलो. पहिल्या चार पाच ओव्हर विचित्र वाटले पण नंतर कोणाचेही लक्ष गेले नाही." टी-20 वर्ल्ड कप शिवाय ऑस्ट्रेलिया डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध टेस्ट मालिकेचेही आयोजन करणार आहे. कोविड-19 (COVID-19) मुळे जागतिक घटनांच्या परिणामावर आज, गुरुवारी, आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीच्या बैठकीत चर्चा होईल. आंतरराष्ट्रीय वेळापत्रक ठरवताना अधिकाऱ्यांना नाविन्यपूर्ण विचारसरणी घेऊन यावे लागेल असे फिंचचे म्हणणे आहे. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने संपूर्ण बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी एका ठिकाणी अॅडिलेड ओव्हल मैदानात आयोजित करण्याचा सल्ला दिला. महामारीच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलिया मालिका वाचविण्याच्या पर्यायाचा शोध घेत आहे. शिवाय, या महामारीमुळे जागतिक प्रवासी निर्बंधही वाढले आहेत.
आयसीसीची चीफ एक्झिक्युटिव्ह कमिटी (सीईसी) एका परिषदेत टी -20 वर्ल्डकपसमवेत आयसीसीच्या सर्व जागतिक स्पर्धेच्या आकस्मिक नियोजनावरही चर्चा करेल.