
इंग्लंडचे (England) ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) क्रिकेट मैदान कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर (Lockdown) खेळ सुरू झाल्यावर चाहत्यांना स्टेडियममध्ये आणण्याचा विचार करीत आहे. 26,000 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या स्टेडियमला किमान 2000 प्रेक्षकांना परवानगी दिली जावी असे लंकाशर क्रिकेट क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेनियल गिडने यांचे मत आहे. इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात मेळावे प्रतिबंधित आहे. त्याचबरोबर सरकारने खेळाडूंना एकत्र खेळण्यास किंवा प्रशिक्षित करण्यास देखील अद्याप परवानगी दिलेली नाही. "मला आशा आहे की आम्ही ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांशिवाय घरगुती क्रिकेट सुरू करू शकेन. आम्ही मर्यादित चाहत्यांसमवेत असे करू शकतो," गिडनीने एपीला सांगितले. एप्रिलमध्ये सुरू होणारा क्रिकेट हंगाम जुलैपर्यंत सुरु होण्याची अपेक्षा आहे. (Coronavirus: पुढील आठवड्यात सुरु होणार इंग्लंड क्रिकेटर्सची ट्रेनिंग, प्रशिक्षणासाठी गोलंदाज वैयक्तिक बॉलचा करणार वापर)
गिडने म्हणाले, 'कधीकधी तुम्ही नकारात्मक होता, पण जेव्हा मी असे बोलतो तेव्हा मी सकारात्मक होतो. मी अशा गोष्टीबद्दल बोलत नाही जे सुरक्षेसाठी शक्य नाही." “मला आशा आहे की आम्हाला कमीतकमी रिक्त स्टेडियममध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या शेवटी काही घरगुती क्रिकेट होईल, परंतु शक्यतो काही प्रमाणात प्रेक्षकही असतील,” असे गिडनीने असोसिएटेड प्रेसला सांगितले. इंग्लंडमध्ये मार्चपासून सर्व प्रकारचे क्रिकेट उपक्रम बंद आहेत. व्यावसायिक क्रिकेटदेखील 1 जुलैपर्यंत स्थगित राहील असं ईसीबीने यापूर्वी नमूद केले होते. लॉकडाउन दरम्यान क्रिकेटपटूही चांगला सराव करू शकत नाहीत. अशा स्थितीत प्रशिक्षण सुरू केल्याने त्यांना दिलासा मिळेल. प्रशिक्षणादरम्यान क्रिकेटपटूंच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल.
दरम्यान, इंग्लंडचे क्रिकेटपटू लवकरच त्यांचे वैयक्तिक प्रशिक्षण सुरू करणार आहेत. कोविड-19 मुळे क्रिकेटचे ठप्प झाले आहे, पण आता गोष्टी हळू हळू रुळावर येतील अशी अपेक्षा आहे. क्रिकेटच्या पुनरागमनाची हे पहिले पाऊल आहे असे इंग्लंड क्रिकेटचे डायरेक्टर एशले जाइल्स यांचा असा विश्वास आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही क्रिकेट सुरक्षितता निश्चित करण्यासाठी ब्रिटीश सरकारसोबत जवळून काम करत आहे. पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले की कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लावण्यात आलेले लॉकडाउन किमान 1 जूनपर्यंत कायम राहील.