इरफान पठाण (Photo Credit: IrfanPathan/Instagram)

भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाण (Irfan Pathan) याने नुकतीच आपल्या सोशल मीडियावर बातमी शेअर केली की बडोद्यात तो राहणाऱ्या भागाला कोविड-19 (COVID-19) चा 'रेड झोन' म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) देशात मोठा परिणाम झाला आहे कारण जवळजवळ 6,000 लोकांमध्ये विषाणूची सकारात्मक चाचणी झाली आहे तर मृतांची संख्या 169 वर पोहचली आहे. ही बातमी सोशल मीडियावर येताच नेटिझन्सने क्रिकेटरला सुरक्षित राहण्यास सांगितले आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. इरफान आणि त्याचा भाऊ युसूफ या व्हायरसमुळे प्रभावित झालेल्यांच्या मदतीसाठी सुरुवातीपासून सक्रिय आहेत. त्याच्या शेजारचे क्षेत्र कोरोना व्हायरस 'रेड झोन' म्हणून घोषित केले गेले आहे अशी बातमी इरफानने ट्विटरवर जाहीर केली. माजी क्रिकेटपटू त्याच्या कुटूंबासह गुजरातमधील वडोदरा येथे मुक्काम करतात. (Coronavirus: तुमच्या जिल्ह्यात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या किती? मृत्यूचे प्रमाण काय?)

"मी राहतो त्या भागाला कोविड-19, बडोदा रेड झोन घोषित केले गेलय’’ असं 35 वर्षीय इरफानने लिहिलं. इरफानने ही बातमी सोशल मीडियावर शेअर करताच अनेक व्यक्तिमत्त्व आणि चाहत्यांनी त्वरीत प्रतिक्रिया दर्शविली आणि त्याला आपल्या कुटूंबाची काळजी घेण्यास सांगितले आणि लवकरच सर्व काही ठीक होईल असं सांगितले. त्यापैकी एक म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज आणि माजी भारतीय संघाचा सहकारी सुरेश रैना ज्याने ‘सुरक्षित राहा भाई’ आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या !! लवकरच सर्व काही ठीक होईल,’असे लिहिले.

सुरेश रैनाची प्रतिक्रिया

सुरक्षित राहा

ही वेळ पण निघून जाईल

काळजी घ्या

दरम्यान, गुजरातमधेही कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहायला मिळाला. राज्यात एकूण 179 रुग्णांची नोंद झाली आहे. 179 पैकी 25 लोकं बरे झाले आहेत तर 16 जणांना या प्राणघातक विषाणूविरूद्ध लढाईत प्राण गमवावे लागले आहेत.