Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या तब्बल 1297 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोना व्हायरस (COVID-1) बाधित रुग्णांची संख्या तब्बल 162 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. दरम्यान, राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असली तरी उपचारानंतर पूर्ण बरे होणाऱ्या रुग्णांचीही संख्या अधिक आहे. अर्थात, राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे ही मोठी चिंतेची बाब आहे. मृतांमध्ये प्रामुख्याने वृद्ध नागरिक आणि मधुमेह अथवा इतर आजार इतर आजार असणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या किती? मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या किती?

खालील तक्त्यात दिलेली आकडेवारी राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या तपशीलानुसार आहे. ही आकडेवारी 8 फेब्रुवारी रोजी आरोग्य मंत्रालयाने उपलब्ध करुन दिलेल्या आकडेवारीनुसार आहे. राज्यातील कोरोना व्हायरस रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील आरोग्य मंत्रालय प्रतिदिन सायंकाळी किंवा रात्री उशिरा प्रसिद्ध करत असते. त्यानुसार ही आकडेवारी आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र: महापालिका संबंधित अनावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना निर्देशन, 50 टक्के उपस्थिती नसल्यास वेतन कापणार)

कोविड-1९ महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती

(*आकडेवारी दि. 08 एप्रिल 2020, सायं 6.00)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई 714 45
2 पुणे महानगरपालिका 166 10
3 पिंप्री चिंचवड मनपा 17 0
4 पुणे ग्रामीण 06 00
5 ठाणे मनपा 24 03
6 कल्याण डोंबिवली मनपा 26 02
7 नवी मुंबई मनपा 29 02
8 मीरा भाईंदर 03 01
9 वसई विरार मनपा 10 02
10 पनवेल मनपा 06 00
11 ठाणे ग्रामीण 03 00
12 पालघर ग्रामीण 03 01
13 रत्नागिरी 03 00
14 यवतमाळ 03 00
15 सातारा 06 01
16 सांगली 06 00
17 नागपूर मनपा 19 01
18 अहमदनगर मनपा 16 00
19 बुलढाणा 08 01
20 अहमदनगर ग्रामीण 09 00
21 औरंगाबाद मनपा 12 01
22 लातूर मनपा 08 00
23 उस्मानाबाद 04 00
24 कोल्हापूर मनपा 02 00
25 उल्हासनगर मनपा 01 00
26 नाशिक मनपा 01 00
27 नाशिक ग्रामीण 01 00
28 जळगाव ग्रामीण 01 00
29 जळगाव मनपा 01 01
30 औरंगाबाद ग्रामीण 01 00
31 जालना 01 00
32 हिंगोली 01 00
33 वाशीम 01 00
34 अमरावती मनपा 01 01
3५ गोंदिया 01 00
3६ अकोला 01 00
एकूण 1135 72

दरम्यान, राज्यासोबत देशातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्याही मोठ्या झपाट्याने वाढते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची देशभरातील एकूण आकडेवारी 5734 इतकी आहे. गेल्या 24 तासात 549 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 473 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल (8 एप्रिल) दिवसभरात कोरोना व्हायरस बाधित 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशभरात कोरोना व्हायरस बाधित एकूण 166 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.