ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (Photo Credit: Getty Images)

क्रीडा विश्वात यापूर्वी अशी परिस्थिती यापूर्वी कधी पाहिली नव्हती. कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) क्रीडा विश्व असहाय झाला आहे. एकीकडे क्रिकेट मालिका, स्पर्धा रद्द होत असताना ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंडमध्ये (New Zealand) वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळण्यासाठी खेळाडू उपस्थित होते, पण त्यांचे समर्थन करणारे प्रेक्षक हजर नव्हते. मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे सिडनी, होबार्टमध्ये खेळला जाणार होता, पण आता हे दोन्ही सामनेही रद्द करण्यात आले आहे. न्यूझीलंड सरकारने आपली सीमा निर्बंध कडक केली आहे आणि ऑस्ट्रेलियाचा त्या देशांच्या यादीत समावेश केला ज्यातून न्यूझीलंडमध्ये प्रवेश करणार्‍यांना 14 दिवसांच्या स्वतंत्र-वेगळे राहण्यासाठी अनिवार्य केले जाईल. परिणामी निर्बंध लागू होण्यापूर्वी किवी क्रिकेट संघाला देशांत परतावे लागणार आहे आणि ते यापुढे चॅपल-हॅडली मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत. (COVID-19: कोरोना व्हायरसने क्रिकेटला केले बोल्ड; 'या' 8 मोठ्या क्रिकेट स्पर्धांवर झाला परिणाम, IPL ही लांबणीवर)

न्यूझीलंडच्या नवीन सीमा निर्बंध सिडनीच्या वेळेनुसार रात्री 10 वाजता अंमलात येणार आहे. सध्या आज संध्याकाळी किवी संघाच्या परतीच्या प्रवासाची तयारी केली जात आहे. रविवारी न्यूझीलंडमध्ये आल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंना आता 14 दिवसांच्या आयसोलेशनमध्ये राहणे बंधनकारक असणार आहे. शिवाय, नव्या सीमेवरील निर्बंधामुळेन्यूझीलंडमध्ये ड्युनेडिन येथे 24 मार्चपासून सुरू होणार्‍या तीन सामन्यांची टी-20 मालिकादेखील पुढे ढकलण्यात आली आहे.

यापूर्वी, भारत-दक्षिण आफ्रिकामधील वनडे मालिकाही रद्द करण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 एकदिवसीय समान्याची मालिका खेळण्यात येणार होती. पहिला सामना धर्मशालामध्ये आयोजित करण्यात आला होता, पण पावसाने  फेरले आणि सामना रद्द करण्यात आला. शिवाय, बीसीसीआयने (BCCI) की 29 मार्च रोजी मुंबईत सुरू होणारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचे जाहीर केल. या घोषणेनंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानेही निवेदन प्रसिद्ध केले की ते त्यांच्या खेळाडूंना भारतात जाण्यापासून रोखणार नाही आणि त्यांना काय करायचे आहे हे ठरविणे आता त्यांच्यावर अवलंबून आहे.