20 जून रोजी कोविड-19 (COVID-19) पॉझिटिव्ह आढळून आलेला बांग्लादेशचा माजी कर्णधार मशरफे मुर्तजाने (Mashrafe Mortaza) यशस्वीपणे या घातक महामारीवर मात केली. मुर्तजाने मंगळवारी आपल्या फेसबुक पेजवर या वृत्ताची घोषणा केली. कोरोनातून सावरल्याच मुर्तजाने जाहीर केले आणि आपल्या शुभेच्छुकांचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. “आशा आहे की प्रत्येकजण ठीक आहे. देवाच्या कृपेने आणि प्रत्येकाच्या आशीर्वादाने, माझी कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी नकारात्मक आली. माझ्या बाजूने उभे राहत या कठीण काळात चिंता व्यक्त केली त्या सर्वांचे मी आभारी आहे,” तो म्हणाला. “घरी उपचार घेतल्यानंतर मी या विषाणूपासून मुक्त झालो आहे. जे प्रभावित आहेत त्यांनी सकारात्मक रहा. अल्लावर विश्वास ठेवा आणि नियमांचे पालन करा. आम्ही एकत्रितपणे व्हायरसशी लढत राहू,” 36 वर्षीय वेगवान गोलंदाजाने जोडले. दरम्यान, मुर्तजाची पत्नी सुमोना हक अद्याप या आजारापासून मुक्त होऊ शकली नाही. त्याच्या पत्नीला प्रार्थनेत ठेवावे आणि व्हायरसविरूद्ध लढाई सुरू ठेवण्यासाठी सेफ्टी प्रोटोकॉलचे अनुसरण करावे अशी त्याने आपल्या चाहत्यांना विनंती केली. (Coronavirus ब्रेक नंतर मैदानावर परतले सुरेश रैना आणि रिषभ पंत, सुरु केली नेट प्रॅक्टिस, पाहा Video)
“निदान झाल्याच्या दोन आठवड्यांनंतरही माझी पत्नी कोरोना व्हायरस संक्रमित आहे. ती चांगलं करीत आहे, तिला तुमच्या प्रार्थनांमध्ये ठेवा,” मर्तजाने म्हटले. दुसरीकडे, नफीस इक्बाल आणि नझमुल इस्लाम हे दोन बांग्लादेशी क्रिकेटपटूही घरी उपचार घेतल्यानंतर आजारातून बरे झाले आहेत. मुर्तजाप्रमाणेच दोघांनीही तीन आठवड्यांपूर्वी कोविड-19 संक्रमित आढळले होते. बांग्लादेशकडून यापुढे कसोटी आणि टी-20 सामने न खेळणाऱ्या मुर्तजाने या वर्षाच्या सुरुवातीला कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. बांग्लादेशमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 190,057 वर पोहचली असून 2,424 जणांचा मृत्यू झाला आहे.
আসসালামু আলাইকুম। আশা করি সবাই ভালো আছেন।আলহামদুলিল্লাহ। আল্লাহর রহমতে ও আপনাদের সবার দোয়ায় আমার করোনা ভাইরাস...
Posted by Mashrafe Bin Mortaza on Tuesday, 14 July 2020
दरम्यान, तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर कोरोना व्हायरस दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाले. इंग्लंडमध्ये सध्या वेस्ट इंडिज आणि इंग्लिश टीममध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. वेस्ट इंडीजने इंग्लंडवर वर्चस्व गाजवत मालिकेतील पहिला सामना चार विकेट्सने जिंकला आणि मालिकेत आघाडी घेतली. दुसरीकडे, जुलैमध्ये बांग्लादेशला त्यांच्या श्रीलंकेचा कसोटी दौरा रद्द करावा लागला. शिवाय, देशातील कोविड-19 परिस्थितीमुळे ऑगस्टमध्ये ठरल्यानुसार न्यूझीलंडचे आयोजन करणार नसल्याचेही बांग्लादेशने म्हटले.