South Africa New COVID-19 Variant: दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा आढळला नवीन प्रकार, नेदरलँड नंतर टीम इंडियाच्या Proteas दौऱ्यावर टांगती तलवार
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) 2020 वर्ष पूर्णपणे नष्ट केले. लोकांना बंद खोल्यांमध्ये राहावे लागले. लाखो लोकांना त्याचा फटका बसला. भारतात (India) या अज्ञात महामारीमुळे तब्ब्ल पाच लाख लोकांचा मृत्यू झाला असून जगभरात 52 लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. आता जनजीवन सामान्य पद्धतीने सुरूच झाले होते की दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा एक नवीन प्रकार (New Variant) आढळला आहे. नवीन कोरोना व्हायरस प्रकारामुळे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour of South Africa) संकटाचे ढग निर्माण झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या या नवीन प्रकारामुळे तिथे खेळण्याबद्दल संभ्रमाचे वातावरण आहे. नेदरलँड्स (Netherlands) देखील आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. 26 नोव्हेंबर रोजी झालेला पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द झाला पण पुढील दोन्ही सामने खेळण्यास त्यांनी नकार दिल्याची बातमी समोर येत आहे. नवीन Nu SARS-CoV-2 प्रकार, ज्याबद्दल शास्त्रज्ञांनी विश्वास वर्तवला आहे की शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टाळू शकते आणि ते अधिक संक्रमित होऊ शकते. (दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोविड-19 चा ओमिक्रॉन विषाणू सर्वात घातक)

दरम्यान, क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) आणि Koninklijke Nederlandse Cricket Bond (KNCB) यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले की, ते खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला प्राधान्य देताना या सद्य परिस्थितीत काय करावे याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. नवीन कोरोनाव्हायरस प्रकार, B.1.1.529, प्रथम बोत्सवानामध्ये आढळला. हा प्रकार दक्षिण आफ्रिकेतही पसरला आहे आणि शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की देशातील नवीन कोविड-19 संसर्गामध्ये अचानक वाढ होण्यात त्याची मोठी भूमिका आहे. आत्तापर्यंत, दक्षिण आफ्रिकेने B.1.1.529 म्हणून सुमारे 100 नमुन्यांची पुष्टी केली आहेत, मुख्यतः गौतेंगच्या लहान परंतु दाट लोकवस्तीच्या प्रांतात. बोत्सवाना आणि दक्षिण आफ्रिका व्यतिरिक्त हाँगकाँग, बेल्जियम आणि इस्रायलमध्ये देखील B.1.1.529 प्रकाराच्या नमुन्यांची पुष्टी झाली आहे.

लक्षात घ्यायचे की भारताच्या मुख्य संघापुर्वी प्रियांका पांचाळचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे, जिथे ते तीन अनधिकृत कसोटी सामने खेळले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया तीन कसोटी सामने, तीन वनडे आणि चार टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 17 डिसेंबरपासून जोहान्सबर्ग येथे पहिल्या कसोटीने मालिकेची सुरुवात होईल.