हार्दिक पांड्या, के एल राहुल यांच्यावर दोन ODI सामन्यांसाठी बंदी? Koffee With Karan कार्यक्रमातील वक्तव्ये भोवणार?
KL Rahul and Hardik Pandya (Photo Credits: Twitter)

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि के एल राहुल (K L Rahul) या दोघांवर दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. बीसीसीआयचे प्रशासकीय प्रमुख विनोद राय ( Vinod Rai) यांनी आज (गुरुवार, 10 जानेवारी) ही मागणी केली आहे. बहुचर्चीत टीव्ही शो 'कॉफी विद करण 6'  (Koffee With Karan 6) ) कार्यक्रमात महिलांबद्धल वादग्रस्त व्यक्तव्य करणे या दोघांना चांगलेच भोवले. या कार्यक्रमात दोघंनी एकत्रच सहभाग घेतला होता. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar)  यांनी या दोघांची मुलाखत घेतली होती.

कॉफी विथ करण कार्यक्रमात मुक्ताफळे उधळल्यानंतर एल के राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्यावर चौफेर टीका होत होती. त्यानंतर दोघांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआयचे प्रशासकीय प्रमुख विनोद राय यांनी या दोन्ही खेळाडूंवर 2 एकदिवसीय सामन्यांवर बंदी घालावी अशी मागणी केली होती. (हेही वाचा, Koffee With Karan मधील वादग्रस्त विधानानंतर Hardik Pandya ने ट्विटरवरुन मागितली माफी)

दरम्यान, या दोन्ही खेळाडूंना कारणे दाखवा नोटीस बजावले होते. तसेच, या नोटीशीला 24 तासांच्या आत उत्तर देण्यासाठी अवधी दिला होता. या दोघांनी ठरवून दिलेल्या वेळेत नोटीशीला उत्तर दिलेही. पण, त्याने बीसीसीआयचे समाधान होऊ शकले नाही. बीसीसीआयला दिलेल्या उत्तरात पांड्या आणि राहुल या दोघांनीही केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. त्यानंतर राय यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, या दोन्ही खेळाडूंच्या उत्तराने बीसीसीआयचे समाधान होऊ शकले नाही. या दोन्ही खेळाडूंवर दोन एकदिवसीय सामन्यांवर बंदी घालावी अशी मी मागणी केली आहे.