CM Eknath Shinde Dangerous Batting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे क्रिकेट खेळण्याचा आनंद (CM Eknath Shinde Playing Cricket) घेतला. पण, त्यांची फलंदाजी उपस्थितांसाठी भलतीच धोकादायक ठरली. कार्यकर्ता आणि प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत मुख्यमंत्र्यांनी लहान मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला खरा. पण, फलंदाजी करताना गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूचा समाचार घेताना त्यांची चांगलीच फजीती झाली. या आधीही असा प्रकार इतर अनेक राजकीय नेत्यांसोबत झाला आहे. पण, शिंदे यांची फलंदाजी काहीशी वेगळीच पाहायला मिळाली. अर्थात ही घटना चुकून घडली. मात्र, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
बॉल हुकला बॅट सुटली
त्याचे झाले असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथील स्वच्छता अभियानाची पाहणी केली. त्यासाठी ते धारावी येथे पोहोचले होते. दरम्यान, गिरगाव चौपाटी येथून जाताना त्यांना काही मुले क्रिकेट खेळताना दिसली. या वेळी त्यांनाही आपल्या लहानपणीचे दिवस आठवले. त्यांनी बच्चेकंपनीसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. पण, हा आनंद घेत असताना चुकून भलतीच घटना घडली. गोलंदाजाने टाकलेला चेंडू फटकावत असताना एकनाथ शिंदे यांच्या हातून बॅट सुटली आणि ती चक्क समोर उपस्थित असलेल्या लोकांच्या दिशेने गेली. यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, एखाद्यासाठी ही घटना जीवघेणी ठरु शकली असती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, Video: भाजप आमदार प्रविण दरेकर मैदानावर शॉट मारायला गेले अन भूईसपाट झाले)
व्हिडिओ
CM Eknath Shinde Batting | एकनाथ शिंदे बॅटिंग करायला गेले अन्... पाहा नेमकं काय घडलं? #CMEknathShinde #Cricket #EknathShindeBatting #Batting #Mumbai #BattingVideo pic.twitter.com/MX3hj8dGZD
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 3, 2023
पृथ्विराज चव्हाण आणि शरद पवार यांचाही रंगला होता डाव
राजकीय नेत्यांना अनेकदा क्रिकेट केळण्याचा मोह होतो आणि ते खेळतातही पाठिमागेही एकदा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पुणे येथील तळजाई टेकडी परिसरातील सादू शिंदे खुल्या स्टेडीयमचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण आणि शरद पवार यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला होता. यावेळी शरद पवार यांच्या बॉलिंगवर पृथ्वीराज चव्हाण यांनी फलंदाजी केली होती. (हेही वाचा, Video: शरद पवारांच्या बॉलिंगवर पृथ्वीराज चव्हाण यांची दमछाक; फटकावला नाही एकही चेंडू)
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या एक्स हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या अभियानात एकाच वेळी संपूर्ण विभागामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून त्यासाठी पालिका अतिरिक्त मनुष्यबळ वापरून तो संपूर्ण विभाग स्वच्छ करणार आहे. यासोबतच धुळीमुळे वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यांच्या दुभाजका जवळची माती उचलणे त्यानंतर संपूर्ण रस्ता पाण्याने धुवून काढणे. तसेच झोपडपट्टी मध्येही अंतर्गत रस्त्यांची डागडुजी, शौचालये दिवसातून 5 वेळा स्वच्छ करणे. तसेच रस्ते, पदपथ, ब्रिज खालील परिसर आणि दुभाजक सुशोभित करून खऱ्या अर्थाने मुंबई स्वच्छ आणि सुंदर बनविण्यात येणार आहे. आज या मोहिमेला सुरुवात करून प्रत्येक आठवड्यात मुंबईचा एक-एक प्रभाग स्वच्छ करण्यात येणार आहेत.