डिसेंबर महिना आला की सर्वांना उत्साह अगदी मोठ्यांनादेखील सांता क्लॉज (Santa Claus) येण्याची उत्सुकता लागलेली असते. कोलकाता येथील एका शेल्टर होममधील मुलांसाठी ख्रिसमस एक आठवड्या आधीच आला. या शेल्टर होमच्या मुलांना विराट कोहली (Virat Kohli) याने स्वतः सांता क्लॉजचे कपडे परिधान करून भेट दिली आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावर या खास दिवसाच्याआधी हसू आणले. स्टार स्पोर्ट्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये विराट, लहान मुलांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना-सचिन तेंडुलकर, पीव्ही सिंधू, क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी भेटण्याची आशा व्यक्त करताना त्याच्या आय-पॅडवर पाहत होता. यानंतर त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य पसरवण्यासाठी विराटने सिक्रेट सांता बनण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मुले सांताकडून त्यांच्या आवडत्या भेटवस्तूंची अपेक्षा करीत होते तेव्हा अचानक लाईट गेली. जेव्हा तो परत आला, तेव्हा कोहली सांताचे कपडे परिधान करून उभा होता. (Christmas 2019: नाताळात ख्रिसमस ट्री ला का आहे विशेष महत्व; जाणून घ्या यामागची कारणे)
सांताला बहुल लहान मुलांचा आनंद पाहण्यासारखा होता. बेल वाजविल्यावर भेटवस्तूंनी भरलेली ट्रॉली समोर आली, जी भारतीय फलंदाजाने मुलांना वाटली. पण, मुलांना सर्वात मोठे सरप्राईस अजून बाकी होते. जेव्हा मुलांना विचारले गेले की त्यांना विराट कोहलीला भेटायचे आहे का? होकार मिळाल्यावर, कोहलीने हळू हळू खोटी दाढी काढून घेतली आणि आपल्या लहान चाहत्यांना मिठी मारून आणि त्यांना त्यांची ख्रिसमस भेट सादर केली. स्टार स्पोर्ट्सने याचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, "या आनंददायक हंगामात, आपण प्रेम पसरवण्याचे लक्षात ठेवूया." तुम्हीही पाहा विराटचा हा सुंदर व्हिडिओ:
Watch @imVKohli dress up as 🎅 and bring a little Christmas cheer to the kids who cheer our sportspersons on, all year long!
This joyful season, let’s remember to spread the love. pic.twitter.com/VF8ltmDZPm
— Star Sports (@StarSportsIndia) December 20, 2019
शेवटी, कोहलीने प्रत्येकासाठी संदेशासह सर्वांचा निरोप घेतला. कोहली म्हणाला की, “हे क्षण माझ्यासाठी खास आहेत.” ही सर्व मुले वर्षभर आमच्यासाठी चिअर करतात आणि या सर्व मुलांना आनंद मिळवून देताना मला खूप आनंद झाला. मेरी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा.” कोहलीने मुलांविषयीची आवड दर्शविण्याची ही पहिलीच वेळ नाही. यंदाच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या वेळी भारतीय कर्णधाराने मुलांबरोबर काही वेळ घालवला होता.