Christmas 2019: नाताळात ख्रिसमस ट्री ला का आहे विशेष महत्व; जाणून घ्या यामागची कारणे
Christmas Tree (Photo Credits: Pexels)

Christmas Tree Importance: नाताळ किंवा ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मियांचा एक महत्वपूर्ण सण आहे. 25 डिसेंबर हा येशुंचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. परंतु काही ठिकाणी नाताळ 25 डिसेंबरऐवजी 6, 7 किंवा 19 जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. ख्रिश्नन लोकं या सणाला फार महत्व देतात. या सणाला ख्रिसमस ट्री आणि नाताळ बाबा या दोघांनाही विशेष आहे. ख्रिसमस म्हटलं की, ही ख्रिसमस ट्री सजवायची गिफ्ट्स लावायचे मग नाताळ बाबा येऊन लहान मुलांना छान-छान गिफ्ट्स देतो अशा गोष्टी या दिवशी केल्या जातात. मात्र हे सर्व का आणि कशासाठी केले जाते हे आपल्या पैकी अनेकांना कदाचित माहित नसेल. Christmas 2019: 'ख्रिसमस'चा सण साजरा करण्यासाठी सुंदर सजवा तुमचा ख्रिसमस ट्री; या 5 डेकोरेशन आइडियाजची होईल मदत

नाताळचा सूचिपर्णी वृक्ष (Christmas Tree) हा पगान संस्कृतीचा वृक्षपूजेचा एक भाग मानला जातो. त्याचा संबंध हिवाळ्यातील संक्रमणाशी आहे. ख्रिसमस ट्री हे नाव प्रथम इ.स.1835 मध्ये उदयास आले. हे वृक्ष दिव्यांच्या माळा आणि अन्य सजावट साहित्यांनी सुशोभित केले जातात. लहान मुलांचे मोजे, छोट्या प्रतीकात्मक काठ्या, छोट्या घंटा, भेटवस्तू अशा गोष्टी लावून हा वृक्ष सजवितात. काही ठिकाणी विशेषतः प्रार्थनास्थळी येशूच्या जन्माचा देखावा मांडला जातो.

ख्रिसमस ट्री परंपरा कशी आली?

ख्रिसमस ट्री ची परंपरा जर्मन लोकांनी सुरू केली असे मानतात. 16 व्या शतकातील संत मार्टिन ल्युथर हे पहिले व्यक्ति होते ज्यांनी आपल्या घरात ख्रिसमस ट्री सजवला होता. पूर्वीच्या काळी ओक झाड ख्रिसमस ट्री म्हणून सजवायचे. परंतु कालानुरूप ख्रिसमस ट्री चे स्वरूप बदलत गेले आणि आता प्लास्टिक आणि विविध स्वरुपात ख्रिसमस ट्री उपलब्ध होतो.

नाताळात ख्रिसमस ट्री ला का आहे विशेष महत्व;जाणून घ्या यामागची कारणे Watch Video 

तर ही ख्रिसमस ट्री चे महत्व. नाताळात ख्रिसमस ट्री सजवणे हा अगदी बच्चे कंपन्यांपासून मोठ्यापर्यंत कुतूहलाचा विषय असतो. अशा वेळी त्या गोष्टीचे खरे महत्व कळलं तर ती सजवण्याची मजा काही औरच असेल.