Christmas 2019: 'ख्रिसमस'चा सण साजरा करण्यासाठी सुंदर सजवा तुमचा ख्रिसमस ट्री; या 5 डेकोरेशन आइडियाजची होईल मदत
ख्रिसमसचा सण धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी 25 डिसेंबरच्या बरेच दिवस अगोदर घरे सजवली जातात, पार्टीची तयारी केली जाते. यामध्ये सर्वात महत्वाचा आहे तो ख्रिसमस ट्री. गरीब असो वा श्रीमंत, या दिवशी प्रत्येक घरात छोटा का होईना पण ख्रिसमस ट्री पाहायला मिळतो.
दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस (Christmas) जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांसाठी ख्रिसमस हा फार मोठा दिवस आहे. ख्रिश्चन धर्माचे लोक हा उत्सव येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा करतात. ख्रिसमसचा सण धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी 25 डिसेंबरच्या बरेच दिवस अगोदर घरे सजवली जातात, पार्टीची तयारी केली जाते. यामध्ये सर्वात महत्वाचा आहे तो ख्रिसमस ट्री (Christmas Tree). गरीब असो वा श्रीमंत, या दिवशी प्रत्येक घरात छोटा का होईना पण ख्रिसमस ट्री पाहायला मिळतो. ख्रिसमसचा उत्सव साजरा करण्यासाठी ख्रिसमस ट्री असणे महत्वाचे मानले जाते. लोक ख्रिसमसच्या झाडाची सजावट करतात, त्याच्यावर विविध गोष्टी टांगल्या जातात.
आज आम्ही तुम्हाला ख्रिसमस ट्री सजवण्याच्या काही आयडीयाज सांगत आहोत.
> घंट्या -
ख्रिसमसच्या झाडाची सजावट सुंदर घंट्यांशिवाय अपूर्ण मानली जाते. आपला ख्रिसमस ट्री सुंदर बनविण्यासाठी आपण सजावटीच्या वेळी बेल्सचा वापर करू शकतात. ख्रिसमसच्या झाडावर चमकदार, रंगीबेरंगी घंटा लावून आपण त्याची सजावट सुंदर बनवू शकता. आजकाल बाजारात विविध प्रकारच्या बेल्स उपलब्ध आहेत.

> लाईट्स -
ख्रिसमसच्या दिवशी संध्याकाळी घरात रंगीबेरंगी प्रकाशासाठी, ख्रिसमसच्या झाडाच्या सजावटीमध्ये रंगीबेरंगी लाईट्सचा वापर करा. ख्रिसमसच्या झाडावर दिवे लावण्यामुळे त्याच्या सौंदर्यात आणखी भर पडेल. या व्यतिरिक्त आपण त्याच्या सजावटमध्ये रंगीबेरंगी मेणबत्त्या देखील वापरू शकता.

> कापूस -
जर आपल्याला ख्रिसमसच्या झाडावर बर्फ दाखवायचा असेल, तर आपण कॉटन म्हणजे कापसाचा वापर करू शकता. झाडाच्या प्रत्येक फांदीवर आपण कलाकुसर करून कापूस सजवून ठेवा. यासह आपण त्यावर एक लहान टॉय देखील ठेवू शकता, जेणेकरून त्याचे सौंदर्य आणखी वाढेल.

रिबन्स -
आपण ख्रिसमस ट्रीच्या फांद्यांवर रंगीबेरंगी रिबन्स लपेटून झाडाची सजावट करू शकता. रिबन्सबरोबरच लहान चमकदार बॉल्सही सजावटीसाठी उपयुक्त ठरू शकतात. काही रिबन्स फांद्यांवर लटकावून खाली सोडा. (हेही वाचा: Christmas 2018: 25 डिसेंबर-ख्रिसमस इतिहास; पहिला ख्रिसमस कधी साजरा झाला?)

भेटवस्तू -
ख्रिसमस हा भेटवस्तूंचाही सण आहे. त्यामुळे ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी त्यावर बऱ्याच भेटवस्तू ठेवून त्याचे तिचे सौंदर्य आणखी वाढवा. ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी आपण बाजारातून भेटवस्तू आणू शकता. या भेटवस्तू ख्रिसमसच्या झाडाच्या सभोवती ठेवा. यासोबर काही स्टार्सदेखील वापरून तुम्ही तुमचा ख्रिसमस ट्री सजवू शकता.

अशाप्रकारे ख्रिसमस एका खास पद्धतीने साजरा करण्यासाठी आपण ख्रिसमसच्या झाडास अगदी सोप्या पद्धतीने सजवू शकता. ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी या झाडाजवळ आपण येशू आणि मदर मेरीच्या मूर्तीसोबत सांटा क्लॉज ठेवू शकता.
(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2019 09:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

