Christmas Celebrations

Christmas 2018: जगभरात आज (25 डिसेंबर) ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ख्रिसमसचा उत्साह अनेक दिवस चालत असला तरी, गेल्या अनेक दशकांपासून 25 डिसेंबर या दिवशीच ख्रिसमस साजरा केला जातो. ख्रिसमसचा दिवस येण्यापूर्वी बराच काळ आधीपासून जय्यत तयारी केली जाते. हा सण साजरा करण्यासाठी वीजेच्या रंगीबेरंगी दिव्यांनी रोषणाई केली जाते. डेकोरेटीव्ह आयटम्सनी लोक आपली घरे सजवतात. ख्रिश्चन धर्मीय लोक या दिवशी खास ख्रिसमस ट्री सजवतात. ख्रिसमसच्या सणात ख्रिसमस ट्रीचे अधिक महत्तव असते. ख्रिसमस ट्रीशिवाय हा सण काहीसा अधूरा अधूरा वाटतो. ख्रिसमस ट्रीचे जसे या सणात महत्त्वाचे स्थान आहे तसेच, 25 डिसेंबर या दिवसाचेही या सणात एक महत्त्वाचे स्थान आहे.

पहिला ख्रिसमस कधी साजरा केला गेला?

पहिला रोमन सम्राट (First Christian Roman Emperor) याच्या सत्ताकाळात इसवी सन 336मध्ये पहिला ख्रिसमस साजरा करण्यात आला. हा दिवस होता 25 डिसेंबर. त्यानंतर काही वर्षांनी पोप ज्युलीयस (Pop Julius) याने 25 डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करावा असे जाहीर केले. तेव्हापासून जगभरात 25 डिसेंबर या दिवशी ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष असे की हा उत्सव केवळ ख्रश्चन धर्मापूरताच नव्हे तर इतर धर्मीयही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. खास करुन बच्चे कंपनीला या दिवसाचे फार आकर्षण असते. (हेही वाचा, Christmas 2018: ख्रिसमस, नाताळ सणासाठी खास मराठी शुभेच्छापत्र आणि मेसेजेस!)

25 डिसेंबर या दिवशी का साजरा केला जातो ख्रिसमस?

25 डिसेंबर हा दिवश येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्माचे लोक येशू ख्रिस्ताला इश्वराचा पूत्र (Son of God) मानतात. तसेच, 25 डिसेंबर हा येशूचा जन्मदिन आहे अशी लोकांची भावना आहे. खरेतर जगभरातील अनेक महापुरुषांच्या जन्माप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या जन्माबाबतही मतमतांतरे आहेत. 25 डिसेंबर या दिवशीच येशूचा जन्म झाला याबाबत कोणताही भक्कम पुरावा नाही. तसेच, ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ बायबलमध्येही अशा प्रकारचा कोणताही उल्लेख नसल्याचे सांगतात. असे असताना मग प्रश्न पडतो की, 25 डिसेंबरलाच ख्रिसमस का साजरा केला जातो? सुरुवातीच्या काळात येशू ख्रिस्ताच्या जन्मावरुन ख्रिश्चन धर्मियांमध्ये प्रचंड मतभेद होते. कारण, भगवान येशूचा जन्म कधी झाला हे नक्की कुणालाच माहिती नव्हते. काही लोकांचे म्हणणे असे की, येशू ख्रिस्ताचा जन्म 2 BC ते 2 BC या कालावधीत म्हणजेच 4 BC मध्ये झाला. मात्र याचा पुरावा कोणाकडेच नाही.