Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 1st Test 2024 Day 2: इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करणं पसंत केले. अब्दुल्ला शफीक आणि शान मसूद यांनी पाकिस्तानसाठी महत्त्वपुर्ण पारी खेळली. या सामन्यात सलमान आघाने देखील शानदार शतकीय पारी खेळली. परंतू मुल्तानच्या मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत काही अशी घटना घडली आहे की ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 117 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर सलमानने जॅक लीच्या गोलंदाजीवर स्टेप आऊट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचा डाव 420 वर 6 बाद असताना सलमान आगा हा 15 धावांवर खेळत असताना त्यांने एक मोठा शॉट खेळला. हा चेंडू उंच हवेत मिड ऑफ बाऊंड्रीच्या दिशेने गेला. त्यावेळी ख्रिस वोक्स बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत होता. ख्रिस वोक्सने शानदार झेल घेतला, मात्र अंपायरने त्याला नॉट आऊट घोषित केलं. (मिड ऑफ बाऊंड्रीच्या दिशेने गेला. त्यावेळी ख्रिस वोक्स बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत होता. ख्रिस वोक्सने शानदार झेल घेतला, मात्र अंपायरने त्याला नॉट आऊट घोषित केलं. (हेही वाचा - Pakistan vs England 1st Test 2024 Day 2 Scorecard: पाकिस्तानकडून सलमान अघाने ठोकले शानदार शतक, पाकिस्तानची धावसंख्या 550 पार )
पाहा व्हिडिओ -
Controversy in Multan! Chris Woakes thought he took the catch cleanly, but the umpire gave it a SIX. Agha Salman bats on 🇵🇰😳#PAKvENG #tapmad #DontStopStreaming pic.twitter.com/5p9j63Fg0u
— Farid Khan (@_FaridKhan) October 8, 2024
अंपायरने काय निर्णय दिला ?
सीमारेक्षेवर कॅच घेतल्यानंतर एकीकडे इंग्लंड संघाने सॅलीब्रेशन स्टॉर्ट केल्यानंतर दुसरीकडे
हा निर्णय अंपायरने तिसऱ्या अंपायरकडे पाठवला. तिसऱ्या अंपायरने हा निर्णय देण्यासाठी वेळ घेतला. त्यानंतर अंपायरला वाटलं की, हा झेल योग्यरित्या घेतला गेलेला नाही. त्यामुळे अंपायरने त्याला नॉट आऊट घोषित केलं. थर्ड अंपायरने हा निर्णय दिल्यानंतर मोठा वाद पहायला मिळाला. अनेकांनी या निर्णयाला चुकिचे ठरवले आहे.