Photo Credit - PCB

Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 1st Test 2024 Day 2 :  इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करणं पसंत केले. अब्दुल्ला शफीक आणि शान मसूद यांनी पाकिस्तानसाठी महत्त्वपुर्ण पारी खेळली. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 253 धावांची भागीदारी केली. अब्दुल्ला शफीक 184 चेंडूत 102 धावा करून बाद झाला. गस एटकिंनसनच्या गोलंदाजीवर ओली पोपने त्याचा झेल घेतला. त्यानंतर लगेचच कर्णधार शान मसूदची विकेट पडली.  शान मसूदने 177 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 151 धावा केल्या.  (हेही वाचा - Pakistan vs England 1st Test 2nd Day Live Streaming: इंग्लंडविरोधातील कसोटी सामन्याचा पहिला दिवस पाक फलंदाजांनी गाजवला, दुसऱ्या दिवशीच्या खेळाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? घ्या जाणून)

पाहा पोस्ट -

पाकिस्तानच्या पहिल्या दिवशी केलेल्या शानदार कामगिरी त्यांनी दुसऱ्या दिवशीही सुरुच केली. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून सलमान आघाने शतक ठोकत संघाला मजबूत स्थितीत नेले. दुसऱ्या दिवशी सौद शकीलने देखील 82 धावांची चांगली खेळी केली. या सर्वांच्या चांगल्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने बोर्डावर 556 धावा लावल्या. इंग्लंडकडून जॅक लिचने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.  तर गस ऍटकिन्सन आणि ब्रायडन कारसे यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.

दरम्यान इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरुवात ही खराब झाली. दुसऱ्याच षटकांत इंग्लंडचा कर्णधार ऑली पोप हा शून्य धावांवर बाद झाला. नसीम शाहने त्याचा विकेट घेतला. सध्या इंग्लंडचा धावसंख्या 4 षटकांनतर 1 बाद 18 असून जॅक कॉवली आणि जो रुट खेळत आहेत.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सइम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच, शोएब बशीर