(Photo Credits: Getty Images)

आयसीसी (ICC) विश्वकप 2019 मध्ये आज वेस्ट इंडिज (West Indies) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) संघात लढत सुरु होणार आहे. दोन्ही संघातील सामना हेडिंग्ले (Headlingley) स्टेडियम वर खेळाला जाईल. वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानचा या विश्वकपमधील हा शेवटचा सामना आहे. वेस्ट इंडिज संघ 8 सामने खेळाला आहे. यामध्ये एकात त्यांनी विजय मिळवला असून 6 सामने त्यांनी गमावले आहेत तर 1 सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरीकडे, अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत तळयाशी आहे. अफगाणिस्तानने आपले 8 ही सामने गमावले आहेत. आजच्या सामन्यात अफगाणिस्तान विश्वकपमधील पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल तर वेस्ट इंडिज संघ सुखद अंत करण्यासाठी प्रयत्न करेल. (ICC World Cup 2019: विश्वकपमध्ये या 5 स्टार खेळाडूंनी केले सर्वाधिक निराश)

वेस्ट इंडिजचा 'युनिव्हर्स बॉस' म्हणून ओळखला जाणाऱ्या ख्रिस गेल ला आजच्या सामान्य विक्रमी खेळी करण्याची संधी आहे. ख्रिसने अफगाणिस्तान विरुद्ध जर 47 धावा केल्यास तो वेस्ट इंडिजसाठी विश्वकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर करेल. हा विक्रम केल्यास गेल देशवासी ब्रायन लारा (Brian Lara) ला ही मागे टाकेल. वेस्ट इंडिजसाठी लाराने 1225 धावा केल्या आहेत. आज सामना वेस्ट इंडिजच नाही तर गेलचाही विश्वकपमधील अंतिम सामना आहे. त्यामुळे हा विक्रम गाठण्याची गेलला ही शेवटची संधी आहे. शिवाय, वनडेत वेस्ट इंडीजसाठी सर्वाधिक धावा काढण्यासाठी गेलला फक्त 18 धावांची गरज आहे. असे करताच गेल लाराला दुसऱ्या क्रमांकावर ढकलेल.

मायदेशात भारत (India) विरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या वनडे आणि टेस्ट क्रिकेट मालिकेनंतर विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. सुरुवातीला गेलने विश्वकपनंतर निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्याने आपल्या या निवृत्तीच्या निर्णयावर यू-टर्न घेत भारतविरुद्ध मालिकेनंतर निवृत्तीची घोषणा केली.