आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 38 व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर श्रेय्यर अय्यरने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर दिल्लीचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या सामन्यात अश्विन हा युनिव्हर्स बॉस क्रिस गेल (Chris Gayle) याच्या बूटांची लेस बांधताना दिसला होता. याच क्षणाचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच क्रिस गेल यांच्यासारख्या फलंदाजाचे  दोन्ही पाय बांधून गोलंदाजी केली पाहिजे, असेही तो म्हणाला आहे. अश्विनच्या गंमतीशीर ट्विटला अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रविचंद्रन अश्विन यांनी केलेल्या ट्विटमध्ये तो म्हणाला की, क्रिस गेलचे दोन्ही पाय बांधून गोलंदाजी करायला हवी. आमच्यासाठी कठिण दिवस होता. या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने नाबाद 106 धावा केल्या. आयपीएलमध्ये सलग दोन शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. हे देखील वाचा-KKR Vs RCB, IPL 2020: कोलकाता नाईट राईडर्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

रविचंद्रन अश्विन याचे ट्वीट-

पंजाब विरुद्ध सामना दिल्लीच्या संघ संघर्ष करताना दिसला. या सामन्यात शिखर धवनने सलग दुसरे शतक ठोकले होते. तसेच आयपीएलमध्ये 5000 धावा करणारा तो पाचवा खेळाडू ठरला आहे. या सामन्यात विजय मिळवून पंजाबचा संघ 8 गुणांसह आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहचला आहे. तर, दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे.