KKR Vs RCB, IPL 2020: कोलकाता नाईट राईडर्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
KKR Vs RCB (Photo Credit: Twitter)

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील (IPL 2020) 39व्या सामन्यात कोलकाता नाईट राईडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Kolkata Knight Riders Vs Royal Challengers Bangalore) आज एकमेकांशी भिडणार आहेत. शेख जायद स्डेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. कोलकाता नाईट राईडर्स संघाचे नेतृत्व इयॉन मॉर्गन करत आहेत. तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधार पद विराट कोहली संभाळत आहे. या सामन्यात कोलकाताच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर कोलकाता नाईट राईडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हे देखील वाचा- CSK Playoff Chances: चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडे अजूनही प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी? वाचा सविस्तर

संघ-

कोलकाता नाईट राईडर्स-

इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शिवम मावी, टॉम बंटन, संदीप वॉरियर, कुलदीप यादव, पॅट कमिन्स, सुनील नरेन, निखिल नाईक, मणिमरण सिद्धार्थ, आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्युसन, प्रशांत कृष्ण, शुभमन गिल, नितेश राणा, सिद्धेश लाड , कमलेश नगरकोटी, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, ख्रिस ग्रीन, राहुल त्रिपाठी.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर-

विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडिकल, गुरकीरत सिंग, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, आरोन फिंच, ख्रिस मॉरिस, डेल स्टेन, इसुरु उदाना, जोशुआ फिलिप, पवन देशपांडे, शाहबाज अहमद, अ‍ॅडम झांपा.