आयपीएल 2021 मधील (IPL 2021) 12 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) राजस्थान रॉयल्सला (RR) 45 धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात महेंद्र सिंह धोनी विकेट किंपिंग करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत महेंद्र सिंह धोनी रविंद्र जाडेच्या गोलंदाजीवर फिल्डिंग लावताना दिसत आहे. दरम्यान, धोनीचे बोलणे स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ही रेकॉर्डिंग पहिली नसून याआधीही महेंद्रसिंह धोनीच्या अनेक स्टम्पमागच्या रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या आहेत.
महेंद्र सिंह धोनी हा मैदानात असताना नेहमी अॅक्टीव्ह असतो. तसेच फिल्डिंग सेट करणे आणि वारंवार गोलंदाजाशी संवाद साधून त्याला मार्गदर्शन करणे, ही त्याची एक अनोखी कला आहे. या आयपीएलमध्ये अजूनही धोनीच्या बॅटमधून धावांचा वर्षाव पाहिला मिळाला नाही. मात्र, फिल्डिंगच्या बाबतीत तो नेहमीच अॅक्टीव्ह दिसला आहे. यातच राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात तो चेन्नईच्या गोलंदाजाला मार्गदर्शन करताना दिसला आहे. याचदरम्यान, धोनीचा आवाज स्टम्पमागच्या माईकमध्ये रेकॉर्ड झाला आहे. हे देखील वाचा- IPL 2021: राजस्थानचा गोलंदाज चेतन सकारियाने महेंद्रसिंह धोनीचे मानले आभार, सोशल मीडियावर केली 'अशी' पोस्ट
ट्वीट-
Listen to Ms Dhoni 😂#CSK #Dhoni #RRvCSK #cskvsrr #ipl2021 #jadeja pic.twitter.com/fCkpPLGVvd
— Pranav Bhardwaj (@pranavwrites) April 19, 2021
सामन्यादरम्यान एमएस धोनी सतत फिल्डिंगमध्ये बदल करताना दिसला. त्याचे शब्द सतत स्टम्पमागच्या माइकमधून ऐकू येत होते. दरम्यान, जाड थोडा पाठी जा, थोडा आत ये, अशा सूचना महेंद्र सिंह धोनी सतत जाडेजाला देत होता. याचवेळी एक खेळाडू धोनीला दिसला नाही. त्यावेळी धोनी म्हणाला की, अरे या ठिकाणचा खेळाडू कुठे गायब होतो सारखा...हा...दिसला, असा आवाज या व्हिडिओमध्ये ऐकायला येत आहे.