T20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियात होऊ शकतो ‘हा’ मोठा बदल, कर्णधार विराट कोहलीनेही दिले संकेत!
विराट कोहली, युजवेंद्र चहल (Photo Credit: Instagram)

Team India for T20 World Cup 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. आयपीएल (IPL) नंतर काही दिवसांनी 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी-20 वर्ल्ड कप (World Cup) 2021 चे रणशिंग फुकणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची (Indian Cricket Team) निवड झाली आहे. पण आयपीएल दरम्यान काही खेळाडू जखमी होण्याची भीती होती आणि तसेच झाले. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) या यादीत आघाडीवर आहे. विराट कोहली (Virat Kohli), जो आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार आहे, त्याने वरुणची जागा कोणता खेळाडू घेऊ शकतो याबाबत संकेत दिले आहे. चक्रवर्ती गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे आणि त्याला बरे होण्यासाठी वेळ लागू शकतो, त्यामुळे वरुणच्या जागी पर्यायाचा शोध सुरू होण्याची शक्यता आहे. (T20 World Cup 2021 Warm-up Schedule: विश्वचषक सराव सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा, ‘या’ दोन संघांशी भिडणार टीम इंडिया)

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “वरुण चक्रवर्तीचे गुडघे फार चांगल्या स्थितीत नाहीत. हे त्याला दुखावते पण जर टी-20 विश्वचषक नसता तर भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाने त्याला पोसण्याचा धोका पत्करणार नाही. त्याला वेदना होता पण सध्या टी-20 वर्ल्ड कपसाठी त्याच्या दुखण्यापासून मुक्त होण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतर पुनर्वसनाचा विचार केला जाईल आणि पुढील रणनीती ठरवली जाईल.” अशा स्थितीत आता चक्रवर्तीच्या जागी बदली म्हणून युजवेंद्र चहलचे (Yuzvendra Chahal) नाव आघाडी आहे. चहलचे शेवटचे काही आंतरराष्ट्रीय सामने लक्षात घेऊन निवड समितीने कदाचित त्याला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला असेल, पण आयपीएलमधील चहलच्या कामगिरीमुळे पुन्हा एकदा या खेळाडूच्या आशा वाढल्या असतील. चहल यूएईमध्ये त्याच्या शेवटच्या 16 सामन्यांमध्ये फक्त एका सामन्यात विकेट घेतली नाही. युएईमध्ये टी-20 विश्वचषक देखील होणार असल्याने चहल वरूण चक्रवर्तीच्या जागी सर्वोत्तम पर्याय असल्याचे दिसत आहे.

बुधवारी आयपीएल 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यातील पराभवानंतर विराट कोहली आपल्या संघाच्या सकारात्मक गोष्टी मोजताना दिसला आणि चहलचे नावही यात सामील आहे. चहलबद्दल बोलताना विराट म्हणाला, “चहल आता खूप चांगली गोलंदाजी करत आहे. त्याच्या फावल्या वेळेत त्याने त्याच्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेतलेली दिसते. त्याची कामगिरीही संघासाठी चांगली चिन्हे आहे.” चहल बराच काळापासून कोहलीच्या आरसीबी संघाचा भाग आहे आणि अशा स्थितीत जेव्हा निवडकर्ते विश्वचषकासाठी वरुणच्या पर्यायाचा विचार करतील तेव्हा कर्णधार कोहली नक्कीच त्याच्या विश्वासार्ह फिरकीपटूचे नाव पुढे करू शकतो.