Makar Sankranti 2025 Wishes: मकर संक्रांती (Makar Sankranti 2025) हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. या दिवशी, जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. हा दिवस पूर्णपणे सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दान करण्याची परंपरा आहे. याशिवाय, या शुभ प्रसंगी तिळाचे लाडू बनवले जातात. तसेच मकर संक्रातीच्या दिवशी लोक तीळगुळाचे वाटप करतात.
यावर्षी मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2025 रोजी साजरा केला जाईल. या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. त्याच वेळी, सूर्य मकर राशीत प्रवेश करताच खरमास महिना देखील संपेल. या दिवशी लोक एकमेकांना सोशल मीडियाद्वारे तसेच भेटून मकर संक्रातीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील Wishes WhatsApp Messages, Quotes आणि Images शेअर करून तुमच्या मित्र-परिवारास या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. आम्ही तुमच्यासाठी काही खास ग्रीटिंग्ज घेऊन आलो आहोत, तुम्ही ते मोफत डाऊनलोड करून सोशल मीडियावर शेअर करू शकता.
मकर संक्रांतीच्या मराठी शुभेच्छा -
पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या
आयुष्यात यश मिळत राहो.
अर्थात यशाच्या शिखरावर जाताना
तुम्ही पतंगाप्रमाणे उंच उंच जावो हीच सदिच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचे आयुष्य यावेळी सूर्याच्या किरणांप्रमाणेच
सुखाने आणि भरभराटीने भरून जावो.
मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात
तीळ आणि गुळाप्रमाणे गोडवा येऊ दे.
मकर संक्रांत तुम्हाला लाभू दे हीच सदिच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोड गुळात एकत्र होईल तीळ,
उडेल पतंग आणि खुलेल मन,
प्रत्येक दिन असेल सुखाचा
आणि प्रत्येक क्षण शांतीचा.
तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या,
मनातील कटवटपणा बाहेर पडू द्या,
या संक्रांतीला तीळगुळ खाताना,
मनात आमची आठवण राहू द्या,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते. खरं तर, या सणाचे महत्त्व सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाशी संबंधित आहे. हा सण केवळ सूर्य देवाला समर्पित आहे.