देशातील आघाडीची आयटी सेवा कंपनी Tata Consultancy Services (TCS) ने गुरुवारी डिसेंबर 2024 मध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे (Q3) निकाल जाहीर केले. कंपनीने निकालांसह गुंतवणूकदारांना लाभांश आणि विशेष लाभांश जाहीर केला आहे. कंपनीने माहिती दिली आहे की तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 12,380 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, गेल्या तिमाहीत कंपनीला 11,909 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तिमाही आधारावर कंपनीच्या नफ्यात ही वाढ 3.9 टक्के आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टीसीएसचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा कमी होते. विश्लेषकांनी 12,399 कोटी रुपयांच्या नफ्याचा अंदाज व्यक्त केला होता. डिसेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न घटून 63,973 कोटी रुपये झाले आहे, जे सप्टेंबर 2024 ला संपलेल्या मागील तिमाहीत 64,259 कोटी रुपये होते. टीसीएसचे मार्केट कॅप 14 लाख कोटी रुपये आहे 9 जानेवारी 2025 रोजी कंपनीचे शेअर्स 1.70 टक्क्यांनी घसरले आणि 4038 वर बंद झाले. (हेही वाचा: Microsoft Layoffs Coming: मायक्रोसॉफ्ट मध्ये Underperforming Employees ला मिळनार नारळ? पुन्हा नोकरकपातीची माहिती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)