TCS Work From Home: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत येण्यासाठी मार्च अखेरपर्यंतचा वेळ दिला असून, त्यांनी तसे न केल्यास ‘परिणाम’ भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांनी कार्यालयात परत येण्याची मुदत मार्च अखेरपर्यंत वाढवली आहे, परंतु तसे करण्याची ही शेवटची अंतिम मुदत असेल असेही त्यांना कळवले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी एनजी सुब्रमण्यम यांनी सांगितले की, ‘आम्ही संयम बाळगत आहोत, परंतु कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात यावे जावे लागेल, अशी तत्त्वत: भूमिका घेतली आहे.’ कंपनीच्या म्हणण्यानुसार, घरून काम केल्याने कर्मचारी आणि नियोक्ते असुरक्षित बनत आहेत. सध्या ज्या प्रकारचे आणि ज्या प्रमाणात सायबर हल्ले होत आहेत ते पाहता, कर्मचाऱ्यांनी घरून काम केल्याने एखादी संस्था अनवधानाने अडचणीत येऊ शकते. घरी व्यवसायांसाठी सुरक्षितता धोके असू शकतात कारण कर्मचाऱ्याच्या घरी सायबर हल्ल्यांना रोखणारी नियंत्रणे असू शकत नाहीत. (हेही वाचा: HDFC Increases MCLR: एचडीएफसी बँकेचा मोठा निर्णय, Home Loan, Car Loan वर भरावे लागणार जास्त व्याज)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)