HDFC Bank (PC - Facebook)

HDFC बँकेने MCLR वाढवला असून याचा परिणाम त्यांच्या ग्राहकांवर होणार आहे. MCLR वाढल्याने ग्राहकांच्या कर्जाचा हफ्ता आता वाढणार आहे. यामुळे ग्राहकांना गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज यांवरचा ईएमआय वाढणार आहे. नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त व्याजदर द्यावे लागणार आहे. हे नवीन दर उद्या म्हणजेच 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यामुळे आधीच महागाईचा फटका आणि बेरोजगारीचा सामना करणाऱ्या सामन्य नागरिकांना मोठा त्रास हा सहन करावा लागणार आहे.

एचडीएफसी बँकेचा MCLR 5 bps 8.80 टक्क्यांवरुन 8.90 टक्क्यांनी वाढवला आहे. एका महिन्याचा MCLR 5 bps 8.85 टक्क्यांवरुन 8.90 टक्क्यांनी वाढला आहे. तर तीन महिन्यांचा MCLR बेस पॉइंट 8.10 टक्क्यांनी वाढवला आहे. तर सहा महिन्यांचा MCLR 9.30 टक्के झाला आहे. HDFC बँक 40 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 3 ते 72 महिन्यांच्या कालावधीसाठी 10.75 टक्के ते 24 टक्के व्याज आकारते. बँक प्रोसेसिंग फी म्हणून ही बँक ग्राहकांकडून 4999 रुपये देखील आकारते.

MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड . बँकेकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जावर MCLR आकारला जातो. ठेवी दर, रेपो रेट, ऑपरेशनल कॉस्ट यांच्या आधारावर MCLR ठरवले जाते. MCLR वाढीचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जांच्या व्याजदरावर दिसून येतो.