Ramzan 2025: मुस्लिम बांधवांसाठी तेलंगणा सरकारने एक विशेष आदेश जारी केला आहे. मुस्लीम बांधवांना रमजान महिन्यात प्रार्थनासाठी वेळ मिळावा म्हणून या निर्णयामुळे 2  मार्च ते 31  मार्च 2025 पर्यंत दुपारी 4:00 वाजता कार्यालये, शाळा आणि इतर सरकारी संस्था कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, जेणेकरून पवित्र महिन्यात प्रार्थनेसाठी वेळ मिळेल. तथापि, आदेशात असे नमूद केले आहे की, सेवेच्या अत्यावश्यकतेमुळे त्यांची उपस्थिती आवश्यक असल्यास ही सवलत लागू होणार नाही.   तेलंगणा सरकारने  शिक्षक, कंत्राटी कामगार आणि बोर्ड, कॉर्पोरेशन आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह सर्व मुस्लिम सरकारी कर्मचाऱ्यांना रमजान महिन्यात लवकर कामावरून जाण्याची  परवानगी दिली आली आहे.  या निर्णयाचा उद्देश मुस्लिम कर्मचाऱ्यांना प्रार्थनेसाठी वेळ देणे हा आहे. तेलंगणा सरकारने मुस्लिम समुदायासाठी उपवास आणि नमाजाचा कालावधी असलेल्या रमजान दरम्यान हा विशेष आदेश जारी केला आहे.

येथे पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)