Photo Credit- X

Jallikattu 2025 Begins in Madurai: तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यात अवनियापुरम येथे 14 जानेवारी पासून जल्लीकट्टू स्पर्धा (Jallikattu Competition) सुरू झाली आहे. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या जल्लीकट्टू स्पर्धेत 1,100 बैल आणि 900 बैल-टेमर (म्हणजेच बैलावर नियंत्रण मिळवणारे) सहभागी (Bull Tamers) झाले आहेत. कडक नियम आणि सुरक्षा उपायांसह स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. वृत्तसंस्था एएनआय नुसार, सर्वोत्तम बैलाला 11 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर दिला जाईल. तर सर्वोत्तम बैल-टेमरला 8 लाख रुपये किमतीची कार आणि इतर बक्षिसे मिळतील. जल्लीकट्टू स्पर्धा मदुराईमधील अवनियापुरम, पलामेडू आणि अलंगनाल्लूर येथे पार पडत आहे. (Makar Sankranti in Varanasi: वाराणसीत मकर संक्रांतीनिमित्त देशभरातून लाखो भाविकांनी गंगा नदीत केले पवित्र स्नान)

जल्लीकट्टू खेळ म्हणजे काय?

जल्लीकट्टू हा जानेवारीच्या मध्यात पोंगल कापणीच्या हंगामात खेळला जाणारा एक दाक्षिणात्य लोकप्रिय खेळ आहे. बैलावर किती काळ नियंत्रण ठेवले जाते यावर आधारित विजेता ठरवला जातो. स्पर्धकाला बैलाला पकडण्याचा प्रयत्न करावा लागतो. बैलाला नियंत्रित करण्यासाठी त्याची शेपटी आणि शिंगे धरावी लागतात. बैलाला एका लांब दोरीने बांधलेले असते. जिंकण्यासाठी,

बैलाला एकाच प्रयत्नात नियंत्रित करावे लागते. एकंदरीत, या खेळाचे लक्ष्य बैलावर नियंत्रण मिळवणे आहे. चार दिवसांच्या कापणीच्या उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी येणाऱ्या मट्टू पोंगलचा भाग म्हणून तामिळनाडूमध्ये हे सामान्यतः खेळले जाते. तमिळ शब्द 'मट्टू' चा अर्थ बैल आहे आणि पोंगलचा तिसरा दिवस हा गुरांना समर्पित आहे. जे शेती प्रक्रियेत प्रमुख सहभागी असतात.

1,100 बैल आणि 900 स्पर्धकांचा थरार

सुरक्षा उपायांसह स्पर्धा सुरू

कडक नियम आणि सुरक्षा उपायांसह स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. वृत्तसंस्था एएनआय नुसार, सर्वोत्तम बैलाला 11 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर दिला जाईल. तर सर्वोत्तम बैल-टेमरला 8 लाख रुपये किमतीची कार आणि इतर बक्षिसे मिळतील. जल्लीकट्टू स्पर्धा मदुराईमधील अवनियापुरम, पलामेडू आणि अलंगनाल्लूर येथे पार पडत आहे.