Photo Credit- X

Pritam Pedro: राजकुमार हिरानी यांच्या बहुप्रतिक्षित वेब सिरीज 'प्रीतम पेड्रो' मध्ये विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) एका नवीन आणि अर्शद वारसी (Arshad Warsi)अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. आधी त्याला मुख्य नायकाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण आता तो वेब सिरीजमध्ये खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या बदलामागील कारणे अधिकृतपणे उघड केलेली नाहीत, परंतु विक्रांतला खलनायकाची भूमिका साकारण्यात उत्सुकता होती. तसेच वेळेचा अभाव असल्याचे सांगितले जात आहे.(Fateh Box Office Collection Day 2: 'फतेह' ने दुसऱ्या दिवशी 'पुष्पा 2' एवढी केली कमाई, पाहा कलेक्शन)

कथा वीर हिरानी आणि अर्शद वारसी यांच्यावर केंद्रित

या वेब सिरीजमध्ये राजकुमार हिरानी यांचा मुलगा वीर हिरानी हा पोलिसाची भूमिका साकारत आहे. ही भूमिका पूर्वी विक्रांत मेस्सीने साकारली होती. अर्शद वारसी या मालिकेतील मुख्य पात्र प्रीतम पेड्रोची भूमिका साकारणार आहे. जो एक जुना तपासकर्ता आहे आणि जुन्या पद्धतींनी केस सोडवण्यावर विश्वास ठेवतो. त्या उलट वीर हिरानी हा तंत्रज्ञान युक्त पोलिसाची भूमिका साकारत आहे.

विक्रांत मेस्सी खलनायक

हा प्रोजेक्ट राजकुमार हिरानींसाठी महत्त्वाचा आहे. ज्यातून ते त्यांचा मुलगा वीर हिरानीला लाँच करत आहेत. जवळजवळ दोन दशकांनंतर अर्शद वारसीसोबत ते पुन्हा काम करत आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित तसेच विक्रांत मेस्सी आणि अर्शद वारसी यांच्यासारख्या तगड्या कलाकारांमुळे 'प्रेम पेड्रो' प्रेक्षकांना एक चांगली कथा आणि उत्कृष्ट अभिनयाने भरलेला अनुभव देईल अशी अपेक्षा करण्यात येत आहे.