Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education कडून आगामी बारावी बोर्ड परीक्षा साठी हॉल तिकीट (12th Hall Ticket) जारी करण्यात आली आहेत. परीक्षेला जाताना दररोज विद्यार्थ्यांना हे हॉल तिकीट घेऊन जाणं आवश्यक आहे. ज्युनियर कॉलेज आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांना 12वीच्या विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटावर मुख्याध्यापकांची सही आणि स्टॅम्प आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने ही हॉल तिकीट्स कॉलेज कडून दिली जातात. mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट वर विद्यार्थ्यांना ही हॉल तिकीट्स मिळतील.
HSC 2025 Admit Card कशी डाऊनलोड कराल?
- mahahsscboard.in ला भेट द्या.
- "Hall Ticket" या विभागावर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा. त्यामध्ये रजिस्ट्रेशन डिटेल्स टाका.
- HSC 2025 exams ची अॅडमीट कार्ड करा.
- हॉल तिकीट प्रिंट करून त्यावर मुख्याध्यापकाची सही आणि स्कूल / कॉलेज स्टॅम्प घ्या.
दरम्यान ही सेवा निशुल्क आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट्स ऑनलाईन घेण्यासाठी कोठेही पैसे द्यावे लागणार नाहीत. विद्यार्थ्यांना हॉलतिकीटावर त्यांचे नाव, परीक्षा केंद्र आणि विषयांसह प्रवेशपत्रावरील सर्व तपशीलांची पडताळणी करणं आवश्यक आहे. काही विसंगती आढळल्यास, विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित शाळा किंवा MSBSHSE शी त्वरित संपर्क साधावा. नक्की वाचा: Maharashtra Board Exam Time Table 2025: महाराष्ट्र शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2025 चे वेळापत्रक; जाणून घ्या तारखा .