Makaravilakku Festival in Kerala

Makaravilakku Festival in Kerala: केरळमधील डोंगराळ मंदिरात आज 'मकरविलक्कू' उत्सव साजरा केला जात आहे. सबरीमाला येथे हा उत्सव साजरा केला जात आहे. मकर संक्रांतीनिमित्त पूजेत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त अग्निशमन व बचाव विभाग, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असल्याने राज्य सरकारने सबरीमाला येथील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जवान आवश्यक साधनसामुग्रीसह तैनात करण्यात आले आहेत. मकर संक्रातीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज म्हणजेच 14 जानेवारीला देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील पहिला मोठा सण आहे. त्यामुळे हा सण देशाच्या विविध भागात आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हेही वाचा: Makar Sankranti in Varanasi: वाराणसीत मकर संक्रांतीनिमित्त देशभरातून लाखो भाविकांनी गंगा नदीत केले पवित्र स्नान

मकरविलक्कू निमित्त सबरीमाला येथे भाविकांनी केली गर्दी

सबरीमाला मंदिर हे भारताच्या केरळ राज्यातील पथनमथिट्टा जिल्ह्यातील पेरियार व्याघ्र प्रकल्पांतर्गत शबरीमला पर्वतावर वसलेले एक महत्त्वाचे मंदिर आहे. हे जगातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असून दरवर्षी ४० ते ५० दशलक्ष भाविक येथे भेट देतात. हे मंदिर भगवान अय्यप्पन यांना समर्पित आहे. दरम्यान, मकरविलक्कूनिमित्त भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.