IND vs WI T20: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने 200 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या विजयासह भारताने मालिका 2-1 अशी खिशात घातली. आता कसोटी आणि वनडेनंतर टीम इंडिया टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत एकूण 5 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना 3 ऑगस्ट रोजी ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे, तर शेवटचा सामना 13 ऑगस्ट रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे. कसोटी, वनडेनंतर टीम इंडिया टी-20 मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
रात्री 8 वाजता सामने होतील सुरू
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होतील. तसेच या मालिकेचे प्रेक्षेपण तुम्हाला डीडी स्पोर्ट्स टीव्हीवर पाहता येईल. तसेच हे सामने तुम्ही मोबाईलवर जिओ सिनेमावर फ्रि मध्ये पाहू शकतात. (हे देखील वाचा: IND vs WI 3rd ODI 2023: वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर हार्दिक पांड्याने नाराजी केली व्यक्त; म्हणाला, बेसिक सुविधा तरी व्यवस्थित द्या)
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 मालिका
पहिला टी-20 - 3 ऑगस्ट (त्रिनिदाद)
दुसरी टी-20 - 6 ऑगस्ट (गियाना)
तिसरा टी-20 - 8 ऑगस्ट (गियाना)
चौथा टी-20 - 12 ऑगस्ट (फ्लोरिडा)
पाचवा टी-20 - 13 ऑगस्ट (फ्लोरिडा)
टी-20 मालिकेसाठी दोन्ही देशांचे संघ
टीम इंडिया - इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, सूर्य कुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडीज - रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकिल हुसैन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशाने थॉमस.