जालना येथे आलिशान कारमध्ये सुरु होती IPL साठी सट्टेबाजी, पोलिसांकडून आरोपींना अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सध्या IPL चा फीवर असल्याने सर्वत्र याबद्दल उत्सुकता आहे. तसेच सट्टेबाज या काळात विविध क्रिकेटच्या संघावर पैसे लावून सट्टा खेळातात. याच पार्श्वभुमीवर जालना (Jalna) येथे एका आलिशान कारमध्ये IPL साठी सट्टेबाजी सुरु होती.तर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणी एका सट्टेबाजासह अन्य चार आरोपींना अटक केली आहे. मनोज अग्रवाल असे या सट्टा लावणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मनोज ह्याने आयपीएल सुरु झाल्यापासून त्याच्या आलिशान कारमध्ये सट्टेबाजी करण्यास सुरुवात केली होती. तसेच कोणाला याची खबर लागू नये म्हणून कारमधून सट्टेबाजी खेळण्यात येत होती. तसेच प्रत्येक वेळी मनोज सट्टेबाजी खेळण्यासाठी कारचे ठिकाण बदल होता.(हेही वाचा-कायरन पोलार्ड याच्या 'या' एकहाती कॅचची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)

तर पोलिसांना एका हॉटेलशेजारी मनोज ह्याच्या कारमध्ये सट्टेबाजी खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मनोज ह्याला अटक केली असून त्याच्याकडून तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांकडून अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे.