MI vs CSK, IPL 2019: कायरन पोलार्ड याच्या 'या' एकहाती कॅचची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)
Kieron Pollard one-handed catch in MI vs CSK game (Photo Credits: IPL Official Site)

काल (3 एप्रिल) मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या आयपीएलच्या (IPL) टी-20 सामन्यात मुंबईने चेन्नईवर विजय मिळवला. मुंबईच्या विजयची वाहवा होत असताना कायरन पोलार्डने (Kieron Pollard) घेतलेला कॅच देखील चर्चेचा विषय ठरला. त्याने एका हाताने घेतलेल्या या कॅचची सध्या सोशल मीडियात भलतीच चर्चा आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने चेन्नईसमोर 171 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र सुरुवात वाईट झाल्याने चेन्नईला सामना गमवावा लागला. सलामीवीर अंबाती रायुडू, शेन वॉटसन हे झटपट तंबूत परतले. त्यानंतर सुरेश रैना आणि केदार जाधव यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र खेळत असताना जेसन बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर सुरेश रैनाने जबरदस्त फटका मारला. तो सिक्सर जाणार असं वाटत असतानाच, कायरन पोलार्डने उडी मारुन एका हातात कॅच पकडला. व्हिडिओ येथे पहा...

कायरन पोलार्ड याच्या या एकहाती कॅचनंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी स्टेडिअममध्ये एकच कल्ला केला. तसंचही कालच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामुळे या विजयानंतर आयपीएलमधील मुंबईचा हा दुसरा विजय ठरला आहे.