भारतीय कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) वाढत्या तुलनांबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना पाकिस्ताच्या (Pakistan) मर्यादित ओव्हरचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) म्हणाला की करायचे असेल तर जावेद मियांदाद, युनिस खान आणि इंझमाम-उल-हक यांच्यासारख्या पाकिस्तानच्या बड्या खेळाडूंशी त्याची तुलना करा. बाबर हा अलीकडचा सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. फलंदाजाने आपल्या कौशल्यांनी सर्वांना प्रभावित केले.आधुनिक क्रिकेटच्या एलिट क्लबमध्ये त्याने स्वत:साठी स्थान बनवले आहे. 2015 मध्ये बाबरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, ज्यानंतर त्याने स्वत:ची बरीच सुधारणा केली आणि आज त्याची तुलना विराटशी केली जाते. तो आणि कोहली 'वेगळ्या प्रकारचे खेळाडू' असल्याचे पाकिस्तानच्या फलंदाजाने अनेकदा सांगीतले आहे. मात्र, आता कोहलीशी आपली तुलना थांबवत बाबर म्हणाला की, त्याची तुलना पाकिस्तानी दिग्गज मियांदाद, मोहम्मद युनुस किंवा युनुस खान यांच्याशी केली पाहिजे. ('विराट कोहली आणि मी वेगळ्या प्रकारचे खेळाडू', टीम इंडिया कर्णधाराबरोबरच्या तुलनेवर पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम ने सोडले मौन)
“माझी विराट कोहलीशी तुलना करण्याची इच्छा नाही. पाकिस्तानचे जावेद मियांदाद, मोहम्मद यूसुफ किंवा युनूस खान यासारख्या पाकिस्तानातल्या दिग्गजांशी माझी तुलना केली तर बरे होईल,” क्रिकेट पाकिस्तानने दिलेल्या वृत्तानुसार गुरुवारी वॉर्स्टरशायर येथून पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना बाबर म्हणाला. कोरोना टेस्ट नकारात्मक आढळल्यावर इंग्लंड दौऱ्यावर येणार बाबर पाकिस्तानच्या 20 खेळाडूंपैकी एक आहे.
25 वर्षीय आझमची वनडे आणि टी-20 मालिकेमध्ये सरासरी 50 पेक्षा जास्त आणि टेस्टमध्ये 45 पेक्षा कमी आहे. दुसरीकडे, कोहली हा एकमेव फलंदाज आहे जो खेळातील तिन्ही फॉर्मेटमध्ये सरासरी 50 च्या वर आहे. गेल्या सहा-सात वर्षांत कोहलीच्या धावांच्या सातत्याने सचिन तेंडुलकरच्या विशेषत: वनडे सामन्यांमधील महत्त्वाच्या विक्रमांचा सामना करण्यासाठी तो अग्रभागी धावपटू बनला आहे. कोहलीने आताच वनडे सामन्यात 43 तर कसोटीत 27 अशी 70 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली आहेत.