2019 मध्ये इंग्लंडला वर्ल्ड कप (World Cup) विजेता बनवणाऱ्या अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याने आपल्या ‘ऑन फायर’ (On Fire) या पुस्तकात भारतीय (India) फलंदाजांच्या धावांचा पाठलाग करण्याच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले होते. स्टोक्सच्या पुस्तकातील त्या टिप्पणीने ऑनलाइन वादळ निर्माण केले. पाकिस्तानला वर्ल्ड कपमधून बाहेर करण्यासाठी टीम इंडिया जाणीवपूर्वक इंग्लंडविरुद्ध हरला असे स्टोक्सने आपल्या पुस्तकात लिहिलं असल्याचा असा दावा पाकिस्तानचे माजी गोलंदाज सिकंदर बख्त (Sikander Bakht) यांनी केला. भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील साखळी सामन्यांचा संदर्भ देत स्टोक्सने लिहिले की, भारतीय संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना योग्य प्रयत्न केले नाहीत. पण, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने केले आरोप स्टोक्सने स्पष्टपणे नकारले. एका ट्विटर यूजरने या संबंधित टिप्पण्या कोठे शोधाव्यात असे विचारले असता, स्वत: स्टोक्सने प्रतिक्रिया दिली. (बेन स्टोक्सने एमएस धोनी याच्या खेळाडूवृत्तीवर केला प्रश्न, टीम इंडियाच्या 2019 वर्ल्ड कप पराभवाचे 'या' 3 खेळाडूंवर फोडले खापर)
स्टोक्सने लिहिले,"मी असे कधीच म्हटले नाही म्हणून आपल्याला ते आढळणार नाही... याला शब्दांचे वळण किंवा क्लिकबेट म्हणतात." गुरुवारी बखत यांनी एक ट्विट केले ज्यामध्ये वर्ल्ड कप दरम्यान टीव्ही चर्चेचा एक जुना व्हिडिओही त्याने पोस्ट केला होता. आपल्या ट्वीटमध्ये बख्त यांनी पुन्हा एकदा याचा पुनरुच्चार केला आणि म्हणाले, "स्टोक्सने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की भारत मुद्दाम इंग्लंडकडून पराभूत झाला जेणेकरुन पाकिस्तान बाहेर पडू शकेल आणि आम्ही त्याचा अंदाज आधीच लावला होता."
You won’t find it cause I have never said it... it’s called “twisting of words” or “click bait” 🤷♂️ https://t.co/uIUYXVaxLB
— Ben Stokes (@benstokes38) May 28, 2020
स्टोक्सच्या 'ऑन फायर' पुस्तकाचा एक भाग माध्यमात काही दिवसांपूर्वी समोर आला. यात स्टोक्सने लिहिले की बर्मिंघममधील सामन्यात भारतीय संघाच्या पाठलाग करण्याच्या रणनीतीमुळे त्यांना आश्चर्य वाटले. स्टोक्स म्हणाला की, भारतीय फलंदाजांमध्ये विजयासाठी उत्सुकतेचा अभाव होता. इंग्लंडने तो सामना 31 धावांनी जिंकला. स्टोक्सला विराट कोहली आणि रोहित शर्माचा दृष्टिकोन "रहस्यमय" वाटला आणि धावांचा पाठलाग करताना महेंद्र सिंह धोनीचा विजयासाठी "कोणताही हेतू नव्हता". हेडलाईन बुक्सद्वारे प्रकाशित केलेले स्टोक्सच्या 'ऑन फायर' पुस्तकात स्टोक्सने वर्ल्ड कपमधील इंग्लंडच्या प्रत्येक खेळाचे विश्लेषण केले.