बीसीसीआयने (BCCI) आयपीएल (IPL) संघांना कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन (Lockdown) वाढवून 3 मेपर्यंत वाढविल्यानंतर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचं सांगितले आहे. ज्यामुळे एप्रिल-मेमध्ये टूर्नामेंट होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले. अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही परंतु बीसीसीआयने आठही फ्रँचायझी आणि प्रसारकांसह सर्व संबंधित पक्षांना ही लीग पुढे ढकलली जात आहे, रद्द केली नाही याची माहिती दिली असल्याचे समजले आहे. एका बीसीसीआयने आम्हाला सांगितले की, "बीपीसीआयने आम्हाला माहिती दिली आहे की आयपीएल अद्याप पुढे ढकलला जात आहे परंतु वर्षाच्या अखेरीस त्यासाठी विंडो मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे." पूर्वी, भारतात जेव्हा 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा झाली तेव्हा त्याचा कालावधी 14 एप्रिल रोजी संपत होता. त्यासोबत आयपीएलदेखील बीसीसीआयने 15 एप्रिलपर्यंत स्थगित केले. (IPL 2020: लॉकडाऊन वाढीनंतर पुढील आदेश येईपर्यंत आयपीएल रद्द, बीसीसीआय सूत्रांची माहिती)
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह सरकारच्या सूचनांची वाट पाहत होते. आता लॉकडाउन वाढवल्याने बीसीसीआय येत्या काही दिवसांत आयपीएलबाबत घोषणा करण्याची अपेक्षा आहे. गांगुली यांनी यापूर्वी देश संकटाला सामोरे जातांना खेळाला प्राधान्य देता येणार नाही हे स्पष्ट केले होते. यापूर्वी, कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिकसह क्रीडा क्षेत्रातील मोठ्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.
आयपीएलची सुरुवात 29 मार्चपासून होणार होती. पहिला सामना चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार होता. संपूर्ण वेळापत्रक निश्चित झाले होते आणि संघांनी तयारी सुरू केली. पण, यानंतर कोरोना व्हायरसचा भारतात होणारा प्रादुर्भाव पाहता सरकारने लॉकडाउन घोषित केले आणि टूर्नामेंटला बीसीसीआयकडून 15 एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली. संपूर्ण जगाप्रमाणेच भारतालाही याचा परिणाम झाला. देशात आजवर 10 हजार हुन अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.