मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) वानखेडेच्या मैदानावरून पाच वर्षांपूर्वी इंटरनॅशनल क्रिकेटला अलविदा म्हटलं होतं. 16 नोव्हेंबर 2013 साली सचिन 74 धावांवर आऊट झाला आणि पुढील काही काळ मैदानावर शांतता पसरली होती. सचिनच्या या आठवणींना आज बीसीसीआयने ( BCCI ) पुन्हा उजाळा दिला आहे. BCCI च्या ट्विटर अकाऊंटवर खेळाडू सचिन तेंडुलकरचं भावनिक भाषण पुन्हा पोस्ट करण्यात आलं आहे.
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) काल (15 नोव्हेंबर) दिवशी एक खास पोस्ट शेअर केली होती. 15 नोव्हेंबर 1989 साली पाकिस्तानविरुद्ध टेस्ट मॅचद्वारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा प्रवेश झाला होता. त्यानंतर सुमारे 24 वर्ष सचिनने क्रिकेट करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले. मात्र दरवर्षी येणारी 15 नोव्हेंबर ही तारीख खास असल्यास त्याने म्हटलं आहे. सचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet
सचिन तेंडुलकरचं Retirement Speech
View this post on Instagram
16 नोव्हेंबर हा दिवस सचिनसह त्यांच्या जगभरातील चाहत्यांसाठी तितकाच खास आहे. पाच वर्षांपूर्वी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सचिन शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने 118 बॉलवर 74 धावा केल्या होत्या. सामना संपल्यानंतर सचिनने त्याच्या मनातील सार्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आणि वानखेडेवर 'सचिन... सचिन....' चा घोष थांबला.