सचिन तेंडुलकर (Photo Credit: Facebook)

15 नोव्हेंबर ही तारीख केवळ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) साठी नव्हे तर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी देखील तितकीचीच खास आहे. ट्विटरच्या माध्यमातून आज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) साऱ्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे. 15 नोव्हेंबर 1989 साली सचिन तेंडुलकरचं (Sachin Tendulkar) टेस्ट मॅच मध्ये पदार्पण झालं होतं. त्यापुढे सुमारे 24 वर्ष क्रिकेट चाहत्यांना मैदानावर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar)  दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला.

सचिन तेंडुलकरचं  #ThrowbackThrusday Tweet 

15 नोव्हेंबर 1989 साली सचिन पहिल्यांदा भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना खेळाला होता. हळूहळू सचिनच्या फलंदाजीचा आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची भुरळ जगाला पडली. क्रिकेटविश्वात २०० टेस्ट मॅच खेळणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे. सचिन तेंडुलकरने 100 इंटरनेशनल शतकं ठोकली आहेत. सोबतच 200 टेस्ट मॅचमध्ये 53.78 च्या सरासरीने त्याने 15921 धावा बनवल्या आहेत. यामध्ये 51 शतकं आणि 68 अर्ध शतकांचा समावेश आहे.

29 वर्षांपूर्वी क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या सचिन तेंडुलकरला आजही तो दिवस तितकाच खास आहे. ट्विटरच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देताना त्याने दरवर्षी 15 नोव्हेंबर ही तारीख खास असल्याचं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. सचिन तेंडुलकरचा अंतिम सामना देखील 16 नोव्हेंबर या दिवशी झाला होता. 14-16 नोव्हेंबर 2013 या दरम्यान वेस्टइंडिज विरुद्ध  वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरने 74 धावा करून क्रिकेटला अलविदा म्हटलं होतं.