कोरोना संकटामुळे टी-20 विश्वचषकाचे (T20 World Cup 2021) आयोजन यूएईत (UAE) करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ नव्या जर्सीत (Indian Cricket Team New Jersey) दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, भारतीय संघ गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्यात आलेल्या मालिकेत नेव्ही-ब्लू जर्सी घालून मैदानात उतरला होता. मात्र, येत्या 13 ऑक्टोबर रोजी भारतीय संघासाठी नवी जर्सी लॉन्च करण्यात येणार आहे. भारतीय संघ कोणत्या जर्सीत मैदानात उतरणार आहे? याची क्रिकेट चाहत्यांसह सर्वांनामध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत किट प्रायोजक एमपीएल स्पोर्ट्सकडून ही जर्सी लाँच केली जणार आहे. "ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहत आहोत! 13 ऑक्टोबर रोजी फक्त lmpl_sport वर मोठ्या प्रकटीकरणासाठी सहभागी व्हा. तुम्ही या नवीन जर्सीसाठी उत्सुक आहात का? असाही प्रश्न बीसीसआयने ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे. हे देखील वाचा- 2021: मुंबई इंडियन्सच्या जेतेपदाची हॅटट्रिक अशक्य, जाणून घ्या प्लेऑफचे हे मजेदार समीकरण
बीसीसीआयचे ट्वीट-
The moment we've all been waiting for!
Join us for the big reveal on 13th October only on @mpl_sport. 🇮🇳
Are you excited? 🥳 pic.twitter.com/j4jqXHvnQU
— BCCI (@BCCI) October 8, 2021
टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेतील सर्व सामने दुबई, अबू धाबी आणि यूएईच्या शारजाहमध्ये खेळले जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 45 सामने खेळले जाणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबरला दुबईमध्ये खेळला जाईल. यावेळी या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत. 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी -20 मध्ये भारताने जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला होता. यंदाही भारताकडून अशीच अपेक्षा केली जाते.
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपरहिट सामना देखील पाहायला मिळणार आहे. येत्या 24 ऑक्टोबरला हे दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देणार आहेत. या मोठ्या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.