इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या दुसऱ्या सामन्यात गुरुवारी राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) फलंदाज आणि केकेआरचे (KKR) गोलंदाजांनी अप्रतिम खेळ केला!. या शानदार सामन्यानंतर केकेआरचे प्लेऑफ (KKR in Playoffs) स्थान जवळजवळ पक्के झाले आहे, तर पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांचा पॅक-अप निश्चित झाला आहे. स्पष्ट बोलायचे तर गेले दोन आयपीएल जेतेपद जिंकणारी रोहित शर्माची (Rohit Sharma) ‘पलटन’ यंदा जेतेपदाची हॅट्ट्रिक करू शकणार नाही. कारण असे आहे की मुंबई समोरील समीकरणे अतिशय मजेदार आहेत आणि त्यावर मात करून अशक्य असा विजय मिळवणे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघासाठी अशक्य आहे. सध्या मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे, तर पंजाब पाचव्या क्रमांकावर आहे. केकेआरचा नेट रनरेट देखील या दोघांपेक्षा अधिक पटीने सकारात्मक झाला आहे. ज्या फरकाने कोलकाताने आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध विजय मिळवला, मुंबईचा संघ नेट रनरेटच्या बाबतीत खूप मागे पडले आहेत. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 14 गुणांसह प्लेऑफमध्ये जाताना दिसत आहे. (IPL 2021, KKR vs RR: केकेआर ‘जितबो रे’! राजस्थान फलंदाज भुईसपाट, शारजाहात कोलकाताचा 86 धावांनी मोठा विजय; Rahul Tewatia एकटा लढला)
मुंबई इंडियन्स सध्या ज्या जटिल समीकरणांना सामोरे आहेत त्याबद्दल जाणून घ्या. सध्या 12 गुणांसह मुंबईचा नेट रनरेट 0.048 आहे, तर कोलकात्याचा 14 गुणांसह 0.587 चा नेट रनरेट आहे. म्हणजेच, मुंबईचा संघ येथे केकेआरपेक्षा 0.539 गुणांनी मागे आहे. त्यामुळे आता जर मुंबईला कोलकाताची चौथ्या स्थानावरून उचल बांगडी करायची असेल आणि स्वतः प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांच्याकडे फक्त एकच पर्याय शिल्लक आहे. आणि तो म्हणजेच मुंबईने हैदराबादविरुद्ध पहिले फलंदाजी करून किमान 200 धावांचा डोंगर उभारला पाहिजे. आता इतक्या धावा करूनही गतविजेत्या संघाला सनरायझर्स हैदराबादला फक्त 29 धावांवर गुंडाळले पाहिजे. म्हणजेच, 171 धावांनी सामना जिंकल्यानंतरच तो प्लेऑफच्या चौथ्या स्थानावरून कोलकाताला खाली खेचू शकतो. आयपीएलच्या इतिहासातील विजयाचे सर्वात मोठे अंतर 146 धावांचे आहे. दुसरीकडे जर या सामन्यात मुंबईने पहिले गोलंदाजी केली, तर त्यांची ही संधीही संपुष्टात येईल.
एकंदरीत, हे समीकरण स्पष्ट सांगत आहे की रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचे आयपीएल इतिहासातील सलग तिसरे विजेतेपद, हॅट्ट्रिक, जिंकण्याचे स्वप्न भंग झाले आहे. अशा स्थितीत केकेआर 14 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी सज्ज आहे. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनंतर आयपीएल 2021 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ आता कोलकाता नाईट रायडर्स असेल.