BCCI Pres Roger Binny (Photo Credit - Twitter)

टी-20 विश्वकप 2022 च्या (T20 World Cup 2022) मध्ये अशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) विषय चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. अशिया चषकला अजुन बराच वेळ आहे, पण या दरम्यान बीसीसीआयचे सचीव जय शाह (Jay Shah) यांनी केलेल्या व्यक्तव्यावर पाकिस्तानमध्ये (Pakistan) चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. त्यामुळे पीसीबी (PCB) बीसीसीआयच्या (BCCI) भूमिकेवरून बॅकफूटवर दिसत आहे. दरम्यान, आता या प्रकरणावर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) यांचे नवे वक्तव्य समोर आले आहे. मात्र, या विधानावरूनही टीम इंडिया (Team India) आशिया कप 2023 साठी पाकिस्तानला (India Tour Of Pakistan) जाणार की नाही हे कळू शकलेले नाही. त्यांनी संपूर्ण प्रकरण केंद्र सरकारवर (Central Govt) सोपवले आहे.

रॉजर बिन्नी यांचे मोठे विधान

बीसीसीआयचे अध्यक्ष रोजेन बिन्नी म्हणाले की, भारतीय संघाने पाकिस्तानला जाण्याचे आवाहन आमचे नाही, असे म्हटले आहे. आमच्या संघाला कुठे जायाचे आहे आणि कुठे नाही हे आम्ही सांगत नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जेव्हाही आमचा संघ दुसऱ्या देशात जातो आणि बाहेर देशातील कुठलाही संघ भारतात येतो तेव्हा आम्हाला सरकारकडून मंजुरी घ्यावी लागते. हा निर्णय आम्ही स्वतः घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. सरकारवर विश्वास ठेवायला हवा. (हे देखील वाचा: India's Tour Of Bangladesh 2022: डिसेंबरमध्ये तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी भारत बांगलादेशला जाणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक)

याआधी जय शाह यांनी केले होते विधान

यापूर्वी, बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले होते की आशिया चषक 2023 पाकिस्तानमध्ये होणार नाही कारण भारतीय खेळाडू पाकिस्तानमध्ये जाऊ शकत नाहीत आणि ठिकाणे तटस्थ असावीत, जिथे दोन्ही देशांचे खेळाडू जाऊ शकतात. यानंतर, पीसीबी प्रमुख रमीझ राजा यांचे कोणतेही वक्तव्य आले नाही, परंतु प्रवक्त्याकडून काही प्रतिक्रिया आल्या. यासोबतच पाकिस्तानने एसीसीला म्हणजे एशियन क्रिकेट कौन्सिलला पत्र लिहून लवकरात लवकर एसीसीची बैठक बोलावण्याची विनंती केल्याचेही वृत्त आहे.